शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवदर्शनासाठी भाविकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:57 IST

जालना शहर व जिल्ह्यातील सर्वच शिवमंदिरांमध्ये मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची सकाळपासूनच गर्दी दिसून आली. ग्रामीण भागातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जालना : जालना शहर व जिल्ह्यातील सर्वच शिवमंदिरांमध्ये मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची सकाळपासूनच गर्दी दिसून आली. ग्रामीण भागातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.नवीन जालन्यातील पंचमुखी महादेव मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली. मंदिर व्यवस्थापनाने महिला व पुरुष भाविकांच्या स्वतंत्र रांगा केल्या होत्या. पहाटे महाभिषेक झाल्यानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने भाविकांसाठी मंदिर परिसरात फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कायम असल्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. वाहतूक व्यवस्था व सुरक्षेसाठी या परिसरात ठिकठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती.शहरातील ढवळेश्वर महादेव मंदिरासह जुन्या जालन्यातील अमृतेश्वर शिव मंदिर, मुक्तेश्वर महादेव मंदिर, सोमेश्वर मंदिर, आनंदीस्वामी मंदिरात भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. जालना तालुक्यातील माळशेंद्रा येथील डोंगरात असलेल्या नीलकंठेश्वर मंदिरात गोंदेगाव, वंजारउम्रद, माळेगाव, वरखेड, बावणेपांगरी, दगडवाडी इ. गावांमधील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.------------जालना शहरापासून काही अंतरावर असलेल्या भोलेश्वर बरडी संस्थानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०८ कुंडी यज्ञ सोहळा झाला. मंदिरात दर्शनासाठी परिसरातील शेकडो भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे दिसून आले.