शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या आईच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांनी मोडल्या शंभर कोटींच्या ठेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:27 IST

शेतक-यांसाठी काळी आई अर्थात त्यांची शेतजमीन हीच असते. शेती जपण्यासाठी शेतकरी अहोरात्र घाम गाळून तिची मशागत करतो. मध्यंतरीच्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतक-याने पोटाला चिमटे देऊन पै-पै.. करून जमा केलेल्या ठेवी मोडण्याची वेळ शेतक-यांवर आली असून, गेल्या दीड वर्षात शेतक-यांचीच बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतून जवळपास शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्याचे दिसून आले आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतक-यांसाठी काळी आई अर्थात त्यांची शेतजमीन हीच असते. शेती जपण्यासाठी शेतकरी अहोरात्र घाम गाळून तिची मशागत करतो. मध्यंतरीच्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतक-याने पोटाला चिमटे देऊन पै-पै.. करून जमा केलेल्या ठेवी मोडण्याची वेळ शेतक-यांवर आली असून, गेल्या दीड वर्षात शेतक-यांचीच बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतून जवळपास शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्याचे दिसून आले आहे.भारत हा पूर्वीपासूनच कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीचा एक, दोन एकरचा तुकडाही शेतक-यांसाठी लाखमोलाचा असतो. तो राबराब राबून त्या शेतीची मशागत करून, त्यात धान्यरूपी सोने पिकवतो. गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती अडचणीत सापडली आहे. त्यातच शासनाच्या तुघलकी धोरणामुळे देखील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. गेल्या दोन वर्षात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतक-यांनी विहीर खोदणे तसेच ठिबक सिंचनासह अन्य शेतीच्या कामासाठी कष्टातून जमवलेल्या ठेवी मोडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या दोन्ही बाबींसाठी अनुदान मिळत असताना शेतकºयांनी त्यांच्या ठेवी का मोडल्या, हा चिंतनाचा विषय आहे.या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेत संपर्क साधला असता ठेवी काढणा-या शेतक-यांच्या अर्जाची बँकेने छाननी केली असता, ठेवलेल्या ठेवी या शेतीच्या विविध कामांसाठी मोडत असल्याचे नमूद केले आहे. अचानक एका वर्षात शंभर कोटी रूपयांच्या ठेवी कमी होणे हे बँकिंगसाठी किती धक्कादायक असते, हे नव्याने सांगणे नव्हे. या बँकेकडे गेल्यावर्षी एकूण ३८३ कोटी रूपयांच्या ठेवी होत्या. त्यात यंदा शंभर कोटी रूपयांची घट झाली आहे. या बॅकेत कुठल्याही अन्य संस्थांची खाते नसल्याने केवळ आणि केवळ शेतकºयांच्या या ठेवी असल्याचे सांगण्यात आले.नेत्यांची आश्वासने वाºयावरदीड वर्षापूर्वी या बँकेचे चेअरमन म्हणून मनोज मरकड यांची निवड झाली होती. त्यांच्या पदग्रहण समारंभास बँकेचे संचालक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच आ. राजेश टोपे यांनी आमच्या वेगेवगळ्या संस्थां, कारखान्यांच्या ठेवी आम्ही या बँकेत ठेवू असे आश्वासन दिले होते. मात्र ते कोणीच पाळले नसल्याचे वास्तव आहे.१०६ कोटींचा पीकविमाजिल्हा मध्यवर्ती बँकेने पीकविम्या पोटी १८ कोटी १० लाख रूपयांचा विम्याचा प्रिमियम भरला होता. त्या तुलनेत बँकेला १०६ कोटी रूपये मिळाले आहेत. जे की त्यांनी जवळपास ४ लाख ३६ हजार शेतक-यांच्या खात्यावर जमा केले आहेत. हा पीकविमा कोणत्या पिकांसाठी किती आला आहे, याचा तपशील विमा कंपनीने न दिल्याने संभ्रम कायम आहे. त्यातच हवामानावर आधारित फळ पीकविमा जिल्ह्यातील १९५२ शेतक-यांना मंजूर झाला असून, त्यापोटी आठ कोटी ७३ लाख रूपये मिळाले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र