शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सलग सुट्यांमुळे कामकाज ठप्प..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:01 IST

सलग सुट्यांमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आधीच उल्हास आणि त्यात सलग सुट्यांचा सुकाळ यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि बच्चे कंपनींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु या सलग सुट्यांमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.जालना जिल्ह्यात यापूर्वीच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विविध विभागांमध्ये जवळपास दोनशेपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने कामकाज ढेपाळले आहे. त्यातच अधिकारी आणि कर्मचारी हे औरंगाबाद, परभणी येथून अप-डाऊन करीत असल्याने जालन्यातील कार्यालये ही रेल्वे वेळापत्रकानुसार चालतात. जिल्ह्यातील तालुक्यांच्या मुख्यालयी देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची राहण्याची मानसिकता नाही. याचा परिणाम कामकाजावर पडत आहे.१ ते १५ आॅगस्ट दरम्यान, सरासरी सहा सुट्या आल्या आहेत. त्यातच काही सुट्या या सलग आल्या असल्याने अनेकांनी शुक्रवारी किरकोळ रजा टाकून गुरुवार ते रविवार असा सुटीचा आनंद घेतला.जिल्ह्यातील मुख्यालयांमध्ये सोमवार आणि शुक्रवार या दिवशी अधिकाºयांनी दौरे करू नयेत, असे निर्देश आहेत. परंतु आठवड्यातील फार क्वचित वेळेस संबंधित विभागाचे अधिकारी ज्या नागरिकांचे त्या विभागात काम आहे, तेथे उपलब्ध होतात. यामुळे सर्वसामान्यांची घोर निराशा होत आहे.एकूणच जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमि अभिलेख, पाटबंधारे, जिल्हा परिषदेतील विविध विभाग तसेच पंचायत समिती, जीवन प्राधिकरण, शासकीय ग्रंथालय आदी विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचाºयांची भेट होणे म्हणजे एक प्रकारचा दुर्मिळ योग असल्याचे मानले जाते.पंचनामा करूनही जैसे थे...जालना शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी नसल्याची तक्रार यापूर्वीच सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी जिल्हाधिका-यांकडे केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष होते.यापूर्वी देखील अनेक विभागांचा थेट तहसीलच्या अधिकारी कर्मचाºयांना सोबत घेऊन पंचनामा केला. परंतु त्यालाही कर्मचारी जुमानत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडेंनीच लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख यांनी केली.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागGovernmentसरकारJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषद