शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

‘पानीपत’ची ऐतिहासिक शौर्य यात्रा येणार परतुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:34 IST

मराठा सेनेच्या अद्भूत व अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देणारी ‘पानीपत’ शौर्य यात्रा परतूर मुक्कामी येणार आहे. यातून पाणीपत युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.

ठळक मुद्देसैनिकांचा झाला मुक्काम : युध्दाची झाली होती खलबते; शहराच्या इतिहासाला मिळणार उजाळा

परतूर : मराठा सेनेच्या अद्भूत व अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देणारी ‘पानीपत’ शौर्य यात्रा परतूर मुक्कामी येणार आहे. यातून पाणीपत युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.पानीपत युध्दाची बरीच खलबते व युध्दाची रणानिती परतूर येथे सैन्य मुक्कामी असताना शिजली होती. पानीपतच्या तिसऱ्या लढाईसाठी १४ मार्च १७६० रोजी परतूर हून सैन्याची आगेकूच झाली होती. ४५ हजार सैन्याचा फौजफाटा व सरसेनापती भाऊसाहेब पेशवे, इब्राहीम गारदीसह शूर मराठे सरदार हे परतूर मुक्कामी होते. या मुक्कामीच या पानीपत युध्दाची बरीच खलबते शिजली होती. याच ठिकाणी सैन्याजवळ अपुरा पैसा असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली होती. याच मुक्कमी नानासाहेब पेशवे यांचे चिरंजीव विश्वासराव पेशवे यांच्याकडे सैन्याचे नेतृत्व देण्यात आले. शहराच्या पश्चिम दिशेला असलेले ऐतिहासिक नृसिंह मंदिर, लिंगायत समाजाचे मठ, शहापी बोधले परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानावर या सैन्याचा मुक्काम झाला होता.परतूरचे हे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता शौर्ययात्रा, पानीपत यात्री एक दिवस मुद्दाम परतूर मुक्कामी येऊन दुसºया दिवशी पानीपतकडे आगेकूच करणार आहे. पानीपत हा मराठ्यांचा धगधगता इतिहास आहे. हा इतिहास जागृत व्हावा व नवीन पिढीला माहिती मिळावी म्हणून कोल्हापूर ते पानीपत ही शौर्य यात्रा सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा मराठे ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने नेण्यात येत आहे. या यात्रेचे कोल्हापूर येथून प्रयाण होत आहे. ज्या ठिकाणी पानीपत युध्दासाठी सैन्याचे पाडाव पडले. त्या ठिकाणी इतिहासकार माहिती देणार आहेत.शौर्याचा इतिहास जागा होईलया शौर्य यात्रेच्या मुक्कामाने युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळेल. सैन्याचे शौर्य हे आजच्या युवकांपुढे यायला पाहिजे. त्यांना इतिहास कळायला पाहिजे. हाच हेतू या यात्रेचा आहे. तसेच तज्ज्ञ इतिहासकारांचे व्याख्यानही यावेळी होणार असल्याचे माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे यांनी सांगितले.युध्दाच्या आठवणीउदगीर- परतूर- बुºहाणपूर- देवास- गुणा- गव्हालेर- कुरूक्षेत्र- पानीपत या ठिकाणी या यात्रेचे पडाव पडणार आहेत. पानीपत युध्दात विरगती प्राप्त झालेल्या ६० हजार मराठा सैनिकांना अभिवादन करण्यासाठी १४ जानेवारी २०२० रोजी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. एकूणच या शौर्ययात्रेने पानीपत युध्दाच्या आठवणी जाग्या होण्याबरोबरच परतूरच्या इतिहासाला उजाळा मिळेल.

टॅग्स :JalanaजालनाhistoryइतिहासPeshwaiपेशवाई