या अवकाळी पावसामुळे शेडनेटचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे केले जातील, परंतु तोपर्यंत तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अनेकांनी या पिकांचा विमा काढला आहे. त्याची माहिती विमा कंपनीला आता २४ तासांच्या आत द्यावी लागते. त्यामुळे शेतकरी माहिती गोळा करण्यात मग्न झाला आहे. या पावसाने बीजोत्पादानावरही मोठा विपरित परिणाम केला आहे.
चौकट
मदतीचे निकष ठरलेले
अवकाळी पाऊस अथवा अन्य काही कारणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर त्यांना केंद्र सरकारच्या आपत्ती विभागाकडून मदत निश्चित करण्यात आली आहे, परंतु ही मदत म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचे काम असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते साईनाथ चिन्नादोरे यांनी केला आहे. या मदतीत कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार ८००, बागायतीसाठी १३ हजार ५०० आणि फळबागांचे नुकसान झाल्यास १८ हजार ८०० रुपये हे हेक्टरी मदत म्हणून तातडीने देण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला आहेत.