शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

उच्च रक्तदाब, मधुमेहाचा वाढतोय विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:31 IST

पुरुषांच्या तुलनेत महिला वर्गाला बीपी, शुगरची अधिक लागण झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत चालू वर्षात जिल्ह्यातील ३५ वर्षांवरील ८४५४७ महिला-पुरूषांची बीपी, शुगर तपासणी करण्यात आली. पुरुषांच्या तुलनेत महिला वर्गाला बीपी, शुगरची अधिक लागण झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. बीपीने ग्रासलेल्या ३५१७ तर शुगरचा आजार जडलेल्या ३३१५ महिला आढळून आल्या आहेत.काळानुरूप बदललेली जीवनशैली, राहणीमान, खाण्या-पिण्यात झालेले बदल हे आज नानाविध आजारांना निमंत्रणच देत आहेत. अवेळी जेवण, अपुरी झोप, कामाचा ताण यासह इतर कारणांनी बीपी, (उच्च रक्तदाब), शुगर (मधुमेह) या आजाराने डोकं वर काढलं आहे. वयाची ३० ते ३५ वर्षे ओलांडलेल्या महिला, पुरूषांना या आजाराची लागण होत असल्याचे समोर आले आहे. या आजाराचा वाढलेला विळखा रोखण्यासाठी, आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी उपचार सुरू करावेत, यासाठी शासनाने २०१५ पासून राज्यभरात असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. या कार्यक्रमांतर्गत गत दोन वर्षांपासून जालना जिल्ह्यात ३५ वर्षावरील महिला, पुरूषांची प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रूग्णालयापर्यंत तपासणी केली जात आहे. बाह्यरूग्ण विभागात किंवा अंतररूग्ण विभागात येणाऱ्या रूग्णांची, नागरिकांची तपासणी केली जात आहे.या कार्यक्रमांतर्गत चालू वर्षात जिल्ह्यातील ८४ हजार १५ महिला, पुरूषांची तपासणी करण्यात आली. यात ६४५३ जणांना शुगरची (मधूमेह) लागण झाल्याचे समोर आले आहे. यात ३०७८ पुरूष तर ३३७५ महिला रूग्णांचा समावेश आहे. तर ६८२० जणांना बीपीची (उच्च रक्तदाब) लागण झाल्याचे समोर आले आहे. यात ३३०३ पुरूष तर ३५१७ महिला रूग्णांचा समावेश आहे. विशेषत: बीपी आणि शुगर हे दोन्ही आजार असलेले ११२३ रूग्ण आढळून आले आहेत. यात ५०७ पुरूष तर ६१६ महिला रूग्णांचा समावेश असल्याचे तपासणीत समोर आले आहे.अशी घ्या दक्षता...वजन नियंत्रित ठेवा, पुरेशी झोप घ्या, तणावमुक्त काम करा, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नका, मद्यसेवन करू नका, आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवा, कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवा, फास्टफूड खाणे टाळा, गोड पदार्थांचे सेवन कमी करा, नियमित व्यायाम करण्यासह वेळोवेळी आरोग्य तपासणी करून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत.रूग्णांचे नियमित औषधोपचारअसंसर्गजन्य रोग प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत बीपी, शुगरचा आजार आढळून येणाºया रूग्णांना मोफत औषधांचा पुरवठा केला जात आहे. यात शुगरचे ५४९० रूग्ण औषधोपचार घेत आहेत. यात २५५६ पुरूष तर २९३४ महिलांचा समावेश आहे. तर बीपीच्या गोळ्या ५७०७ रूग्ण घेत आहेत. यात २७६८ पुरूष तर २९३९ महिला रुग्णांचा समावेश आहे. तर दोन्ही आजारांची लागण असलेले ६४३ जण नियमित औषधोपचार घेत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यdiabetesमधुमेहWomenमहिला