शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन तास धो..धो..पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:51 IST

जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जालना शहरात सायंकाळी सहानंतर दोन तास मेघगर्जनेसह पाऊस झाला. त्यामुळे सर्व रस्ते जलमय झाले होते. जाफराबाद, परतूर, बदनापूर, अंबड तालुक्यातही मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मृग नक्षत्रात पावसाने प्रथमच जोरदार हजेरी लावल्यामुळे बळिराजा सुखावला आहे.जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. वातावरणातही प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मृग नक्षत्र लागल्यापासून दोन दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस आजही बरसणार की नाही, असे वाटत असतानाच जालना शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल अडीच धो धो पाऊस बरसला. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. मस्तगड परिसरात नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. शिवाजी पुतळा, कादराबाद, मामा चौक परिसरातील रस्तेही जलमय झाले होते.जालना तालुक्यातही पावसाने सर्वदूर हजेरी लावली. तालुक्यातील वंजारउमद्र, पीरपिंपळगाव, माळशेंद्रा, गोंदेगाव, माळेगाव, जामवाडी, गुंडेवाडी, घानेवाडी, पानशेंद्रा, इंदेवाडी, सिरसवाडी, कडवंची, नंदापूर, धारकल्याण, रामनगर, रेवगाव, गोलापांगरी शिवारात पावसाने दोन ते अडीच तास जोरदार हजेरी लावली. भोकरदन, केदारखेडा, पारध, टेंभूर्णी, नांदखेड, हसनाबाद परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. नांदखेड परिसरात हवेमुळे काही घरांवरील पत्रे उडून गेले. अंबड तालुक्यातही बहुतांश भागात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. भोकरदन परिसरातीही रात्री नऊच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.दरम्यान, जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. आता खऱ्या अर्थाने शेतीच्या कामांना वेग येणार आहे. बहुतांश भागात शेतकºयांनी कपाशी लागवडीसाठी शेत तयार करून शेतात ठिबक सिंचन अंथरून ठेवले आहे. काही शेतकºयांनी बी-बियाणांची खरेदी पूर्ण केली आहे. त्यामुळे कपाशी लागवडीसह पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.गैरसोय : सहा तास वीजपुरवठा खंडितजालन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटात वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी सात ते १२ वाजेपर्यंत सहा तास वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. अगोदरच पाणी साचलेल्या रस्त्यावरून अंधारातून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. ग्रामीण भागातही बहुतांशी ठिकाणी वीज गेल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारातच काढावी लागली.

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीज