शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गॅरेज लाईनला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:33 IST

जालना : शहरातील बसस्थानक परिसरातील राऊतनगरमधील गॅरेज लाईनला रविवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत आठ दुकाने जळाली. या घटनेत जुन्या वाहन्यांच्या ...

जालना : शहरातील बसस्थानक परिसरातील राऊतनगरमधील गॅरेज लाईनला रविवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत आठ दुकाने जळाली. या घटनेत जुन्या वाहन्यांच्या महागड्या मशिनरी व अन्य साहित्य जळाल्याने सुमारे २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.जुन्या मोंढ्याच्या पाठीमागील बाजूस राऊतनगरमधील जागा अशोक भल्लार यांनी काही व्यक्तींना भाडेतत्त्वावर दिली आहे. या ठिकाणी बहुतांश जणांनी गॅरेज थाटले असून, किरकोळ विक्रेते रात्रीला हातगाड्याही उभ्या करतात. रविवारी मध्यरात्री एका गॅरेज दुकानाला आग लागली. आॅईल, डायनोमा, टायर इ. साहित्यामुळे आग भडकली. त्यामुळे एकमेकांना लागून असलेली आठ गॅरेजची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गॅरेज लाईनच्या समोरील बाजूस असलेल्या शासकीय धान्य गोदामाचेही आगीमुळे नुकसान झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे डी.एम.जाधव घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन विभागाचे अब्दुल बासेत, व्ही. के. बनसोडे, कमलसिंग राजपूत, आर.के.बनसोडे, सागर गडकरी, विठ्ठल कांबळे, अशोक वाघमारे, दत्ता मोरे, सुरेंद्र ठाकूर यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परतूरचा एक बंबही घटनास्थळी पोहोचला. उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह स्थानिकांनी आग विझविण्यासाठी मदत केली. चार बंबच्या मदतीने तीन तासांत आग नियंत्रणात आली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आकस्मिक जळीत म्हणून नोंद करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल सुधाकर मगरे तपास करीत आहेत.------------मशिनरी, बॅट-या, इलेक्ट्रॉनिक साहित्य खाकआगीच्या या घटनेत किरकोळ कापड विक्रेते बालाजी विठ्ठल दावत व विनोद रामूल अलशेटी यांचे हातगाडीवरील रेडिमेड कपडे जळाल्याने एक लाखाचे नुकसान झाले. सुपर भारत बॅटरी या दुकानातील साहित्य जळाले. शेख फिरोज अख्तर, शेख युनूस यांच्या गॅरेजचे एक लाखाचे नुकसान झाले. नजीर खान, मजर खान या जुन्या वाहन विक्री व्यवसाय करणा-या दोघांच्या जुन्या कारच्या महागड्या मशिनरी, कागदपत्रे जळाल्याने सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले. तर हॉटेल संगीतामधील साहित्याचेही नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.