शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक ! कौटुंबिक कलहातून महिलेची ४ लेकरांसह विहिरीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 13:54 IST

जालन्यातील घुंगर्डे हादगाव गावातील हृदयद्रावक घटना, कौटुंबिक कलहतुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज...

वडीगोद्री ( जालना ) : जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील एका विवाहितेने पतीच्या दारूच्या व्यसनामुळे व कुटूंबिक वादातून पोटच्या चार लेकरासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची ( Woman commits suicide with 4 children in Jalana) हृदयद्रावक घटना आज उघडकीस आली आहे. गंगासागर ज्ञानेश्वर अडाणी (३२),भक्ती (१३),ईश्वरी(११),अक्षरा(९) व मुलगा युवराज (७) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अंबड तालुक्यातील घुंगर्ड हादगाव गावातील ज्ञानेश्वर प्रल्हाद अडाणी हे पत्नी गंगासागर अडाणी व तीन मुली आणि एक मुलासह गावात राहतात.काल ३० डिसेंबर रोजी  दुपारी १२ ते १ च्या दरम्यान गंगासागर ह्या तीन मुली व मुलासह शेतात चक्कर मारायला गेल्याचे अनेकांनी पाहिले. गंगासागर यांनी मुलामुलीसह सायंकाळी ५.३० शेतातच वेळ घालवला. 

सात वाजेपर्यंत ही गंगासागर व मुलं-मुली घरी परतले नसल्याने ज्ञानेश्वर अडाणी व गावातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधाशोध केली. परिसरातील सर्व विहिरी व जायकवाडी डावा कालवा परिसर पिंजून काढला.मात्र त्या आढळून आल्या नाही. रात्र झाली तरी घरी न आल्यामुळे घरच्यांनी व गावातील काही लोकांनी त्यांचा शोध सुरू केला.गावकरी व अडाणी कुटुंबातील सदस्य यांनी ही आजूबाजूच्या शेतात व विहिरी पिजून काढल्या.त्यानंतर रात्रभर  शोध घेऊन ही सापडले नव्हते.

आज सकाळीच काहींच्या नजरेत अडाणी यांच्या शेताशेजारच्या गणेश फिसके यांच्या गट नं ९३ मधील विहिरीत या पाचही जणांचे मूतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले.गंगासागर अडाणी हिने आपल्या चार मुलांसह विहिरीत उडया मारून आत्महत्या केली असल्याचे आढळून आले.दरम्यान, या घटनेची माहिती गोदी पोलीस ठाण्यात दिल्याने घटनास्थळी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ सह कर्मचारी हजर होऊन या पाचही जणांचे मृतदेह विहिरी बाहेर काढून जाग्यावर शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोंदी पोलिसांनी ज्ञानेश्वर अडाणी यांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :JalanaजालनाDeathमृत्यू