शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांअभावी आरोग्यसेवाच आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:36 IST

जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांतील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या रिक्त जागांमुळे कारभार संथगतीने सुरू आहे. मूलभूत आणि जीवनावश्यक सुविधांपैकी एक असलेल्या आरोग्य खात्यात तब्बल २५७ कर्मचा-यांची पदे रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांतील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या रिक्त जागांमुळे कारभार संथगतीने सुरू आहे. मूलभूत आणि जीवनावश्यक सुविधांपैकी एक असलेल्या आरोग्य खात्यात तब्बल २५७ कर्मचा-यांची पदे रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे. शासनाने थेट निवड पद्धतीने या जागा भरण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, जागा कधी भरल्या जातील, याची शाश्वती नसल्याने सध्या तरी अधिकारी आणि कर्मचा-यांअभावी आरोग्य विभागच सलाईनवर आहे.जिल्ह्यातील आरोग्यविषयक सुविधेच्या कामाचा व्याप मोठा आहे. जिल्हा परिषद सर्कल, मोठी बाजार गावे मिळवून एकूण ४० आरोग्य केंद्रे, २१३ उपआरोग्य केंद्रे आहेत. या व्यतिरिक्त एक उपजिल्हा रुग्णालय, एक जिल्हा रुग्णालय, स्त्री व बाल रुग्णालय आणि तालुका पातळीवर आठ ग्रामीण रुग्णालये आहेत. ग्रामीण भागात गोरगरीब, गरजू रुग्णांना शासकीय आरोग्य सेवेचाच आधार आहे. असे असले तरी आवश्यक सुविधांचा अभाव व रिक्त पदांमुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कर्मचारी राहत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत.एखादी दुर्घटना घडल्यास शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना दिवस-दिवस ताटकळत बसावे लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शिवाय आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ रिक्त पदांमुळे गरजूंना मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रिक्त पदे भरण्याबाबत आरोग्य विभागाकडून केवळ कागदी घोडे नाचविण्याचे प्रकार सुरू आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वच जबाबदार पदाधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.जिल्हा आरोग्य विभागात वर्ग एक व दोनची अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा लसीकरण अधिकारी,प्रशासन अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी ही महत्त्वाची पाच पदे रिक्त आहेत.