जालना : आगामी नगरपरिषद निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढविणार असल्याची माहिती मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी दिली.
जालना शहरातील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली.
वाढती महागाई, पेट्रोल दरवाढ, रोजगाराचे प्रश्न या सोबत स्थानिक वीज, रस्ते व आरोग्य विषयक मुद्दे घेऊन वंचित बहुजन आघाडी मराठवाड्यातील नगरपरिषद निवडणुका स्वबळावर लढणार आहे. तसेच जनतेच्या प्रश्नावर जन आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगत पक्षसंघटना वाढीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष दीपक डोके, ॲड. अशोक खरात, केशव मुद्देवाड, संतोष सूर्यवंशी, रमेश गायकवाड, डॉ. धर्मराज चव्हाण, प्रा. डॉ. सुरेश शेळके, जितेंद्र शिरसाट आदींची उपस्थिती होती.
यावेळी जालना जिल्हा पूर्व व पश्चिम कार्यकारिणीच्या स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने, डेव्हिड घुमारे यांच्यासह ॲड. हर्षवर्धन प्रधान, दीपक घोरपडे, विष्णू खरात, चंद्रकांत कारके, सतीश खरात, अकबर इनामदार, ॲड. कैलास रत्नपारखे, शेख लालाभाई, खालेद चाऊस आदींची उपस्थिती होती.