शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

जालन्यातील जनावरे चोरीत सिल्लोड येथील आरोपींचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 19:12 IST

जालना तालुक्यातील भिलपुरी शिवारातील जनावरे १५ सप्टेंबर रोजी रात्री चाेरून पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांची जीप चिखलात फसली होती.

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाईदोघे जेरबंद, इतर गुन्ह्यांचा तपास सुरू

जालना : जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांतील जनावरे चोरीमध्ये सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथील आरोपींचा हात असल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईत समोर आले आहे. जालना गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी सिल्लोड येथे कारवाई करून दोन संशयितांना ताब्यात घेतले.

जावेद शब्बीर पटेल (रा. इदगाहनगर सिल्लोड) व मोहंमद कुरबान मोहंमद अजीज अन्सारी (रा. धुळे ह. मु. शिक्षक कॉलनी, सिल्लोड) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. जालना तालुक्यातील भिलपुरी शिवारातील जनावरे १५ सप्टेंबर रोजी रात्री चाेरून पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांची जीप चिखलात फसली होती. त्या वेळी ग्रामस्थांनी वाहनासह जनावरे ताब्यात घेत पोलिसांना माहिती दिली. परंतु, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले होते. या प्रकरणात मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या जनावरे चोरीमध्ये सिल्लोड येथील दोघांचा हात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पथकाने मंगळवारी दुपारी कारवाई करून जावेद पटेल, मोहंमद कुरबान मोहंमद अजीज अन्सारी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर इतर सहकाऱ्यांच्या मदतीने चोरीची कबुली त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुभाष भुजंग, पोउपनि प्रमोद बोंडले, हवालदार प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, कृष्णा तंगे, रुस्तुम जैवाळ, सुधीर वाघमारे यांच्या पथकाने केली.

मोकाट जनावरांवर डोळाजालना शहरासह परिसरात मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जनावरे चोरणे सोपे होत होते. ही बाब पाहता या चोरट्यांनी जालना शहर व परिसरातील मोकाट जनावरे चोरण्याकडे मोर्चा वळविल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

दोन दिवसांची पोलीस कोठडीगुन्हे शाखेने जेरबंद केलेल्या संशयितांना मौजपुरी पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले होते. मौजपुरी ठाण्याचे सपोनि. विलास मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन्ही संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित संशयित आरोपींकडून जनावरे चोरीच्या इतर घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी