बदनापूर तालुक्यात सध्या रबीतील पिके जोमात आली असून, फळबागाही चांगल्या बहरल्या आहेत; परंतु कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ही पिके धोक्यात आली आहेत. एकीकडे महावितरणच्या कारवाईमुळे शेतकरी त्रस्त झालेले असताना दुसरीकडे तालुक्याच्या विविध भागांत बुधवारी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. तालुक्यातील सिरसगाव घाटी, लालवाडी, सागरवाडी, ढासला, सोमठाणा, मालेवाडी आदी गावच्या शिवाराला गारपिटीसह पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे या भागातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती सागरवाडीचे चरण बम्हणावत, ढासलाचे सरपंच राम पाटील, मालेवाडीचे शिवाजी कडोस यांनी दिली.
कॅप्शन : बदनापूर तालुक्यातील सागरवाडी शिवारात झालेली गारपीट. (१७ जेएनपीएच २७, २८)
===Photopath===
170221\17jan_3_17022021_15.jpg~170221\17jan_6_17022021_15.jpg
===Caption===
(१७ जेएनपीएच २७, २८)~कॅप्शन : बदनापूर तालुक्यातील सागरवाडी शिवारात झालेली गारपीट. (१७ जेएनपीएच २७, २८)