शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजना; निव्वळ बोगसगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:24 IST

शासनाने १२ हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करून राज्यभर जलयुक्त शिवार योजना राबविली, हा निव्वळ बोगसगिरीचा प्रकार असल्याचा आक्षेप राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. एच.एम. देसरडा यांनी सोमवारी आयोजीत पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाने १२ हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करून राज्यभर जलयुक्त शिवार योजना राबविली, या माध्यमातून राज्यातील १६ हजार गावे जलसंपन्न केल्याचा दावा करत आहे. हे वास्तव नाही. हा निव्वळ बोगसगिरीचा प्रकार असल्याचा आक्षेप राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. एच.एम. देसरडा यांनी सोमवारी आयोजीत पत्रकार परिषदेत केला.राज्यात हिवाळ्यातच पाणी टंचाई, जनावरांचा चारा, मजूरांच्या हाताला कामे आदींची टंचाई निर्माण झाली आहे. नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. असे असतांना देशाचे पंतप्रधान शिर्डी येथील कार्यक्रमात १६ हजार गावे जलसंपन्न झाल्याचे सांगतात तर दुसरीकडे राज्य सरकारला २० हजार गावात दुष्काळ का जाहिर करावा लागतो. याचे उत्तर राज्य शासन देत नाही. कारण जलयुक्त शिवार योजनेला कुठलाच शास्त्रीय आधार नसतांना चुकीच्या पध्दतीने नदी, नाल्यांचे खोदकाम केल्याचेही देसरडा म्हणाले. याला तज्ज्ञांनी देखील दुजोरा दिला आहे. यामुळे अवर्षण आणि दुष्काळ दोन वेगळे भाग असल्याचे देसरडा यावेळी म्हणाले. जर राज्यातील १६ हजार गावे जलसंपन्न झाल्याचा दावा केला जात असेल तर कुठल्याच गावाचा पाणीप्रश्न निर्माण झाला नाही, त्या गावांची यादी शासनाने जाहीर करण्याची मागणी यावेळी देसरडा यांनी केली.दुष्काळ आणि पाणी टंचाईला शासनाने राबविलेली चुकीची विकासाविषयक धोरणे जबाबदार असल्याचा आरोप देसरडा यांनी केला. मराठवाड्यात सध्या दुष्काळाची भयावह स्थिती पहावयास मिळत आहे.मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावात भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून दुष्काळाची दाहकता जाणून घेण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामुळे शासनाने दुष्काळावर उपाययोजना करतांना वेळ न घालवता तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण यात विलंब झाल्यास शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची भीती देसरडा यांनी व्यक्त केली.यावेळी गोखले अर्थशास्त्र संस्था पुणे आणि राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळ यांच्या सयुक्त विद्यमाने २३ नोव्हेंबर दुपारी १ वाजता गोखले संस्थेकडून पुणे येथील शिवाजी नगर येथे बैठकीचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागात जाणवत असलेल्या विविध समस्यांवर राज्यातील सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक, लोकप्रतिनधी यावर विचामंथन होणार असल्याची माहिती गोखले अर्थशास्त्र संस्थेचे डॉ. नरेश बोडखे यांनी सांगितले. पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देसरडा आणि बोडखे यांनी दिली. या दौऱ्याचा हेतू दुष्काळ जाणून घेणे असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प