शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ गुटखा सव्वा दोन लाखांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:42 IST

पोलिसांनी पकडलेला गुटखा २ लाख ११ हजार २०० रूपये किमतीचा असल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील तोतला पेट्रोल पंपाच्या पाठीमागे सोमवारी रात्री सदरबाजार पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणारा रिक्षा ताब्यात घेतला होता. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मंगळवारी पंचनामा करण्यात आला असून, पोलिसांनी पकडलेला गुटखा २ लाख ११ हजार २०० रूपये किमतीचा असल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात वाहन चालक व मालकाविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याचे पो.नि. संजय देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी रात्री जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात सोमवारी रात्री कारवाई करून गुटख्याची अवैध वाहतूक करणाºया एका रिक्षाला (क्र. एम.एच.१५- ए.जी.१३३०) मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले होते. या गुटख्याचा अन्न सुरक्षा अधिकारी व. ता. रोडे यांनी मंगळवारी सहकाऱ्यांसमवेत पंचनामा केला. त्यावेळी ११ गोण्यांमध्ये ४४ बॉक्स असा एकूण १७६० पेपर बॉक्समध्ये भरलेला २ लाख ११ हजार २०० रूपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केल्याचे समोर आले. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहन चालक व मालकाविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागJalna Policeजालना पोलीस