महिलांना मार्गदर्शन
अंबड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत साष्ट पिंपळगाव येथे आयोजित शेती शाळेत महिला शेतकऱ्यांना कीड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडल कृषी अधिकारी राजेंद्र दुबे, कृषी सहाय्यक सुवर्णा पाटील, कृषी सहाय्यक शांता श्रीगंदेवार आदींनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास साष्ट पिंपळगाव व परिसरातील महिलांची उपस्थिती होती.
सूचना फलक गायब
बदनापूर : जालना- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अनेक दिशादर्शक, सूचना फलक गायब झाले आहेत. फलक नसल्याने वाहन चालकांची गैरसोय होत आहे. शिवाय अपघात प्रणव क्षेत्रातील अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या महामार्गावर गरजेनुसार सूचना फलक, दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.