विठ्ठल नगरमध्ये कार्यक्रम
परतूर : शहरातील विठ्ठल नगर भागात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आदर्श शिक्षक दिलीप मगर, मुख्याध्यापक विष्णू कदम, योगेश मगर, अनया चव्हाण, कार्तिक कवले, माहेश्वरी विलास चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
गुरूकुल विद्यालयामध्ये शिवजयंती साजरी
आष्टी : परतूर तालुक्यातील लिखित पिंपरी येथील संत तुकाराम महाराज गुरुकुल विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमास गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष राधाकिशन सोळंके यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
सातोना गावामध्ये क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ
सातोना : परतूर तालुक्यातील सातोना खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महेश आकात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोहन आकात, विलास आकात, सरपंच विकास आकात यांच्यासह परिसरातील खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेत परिसरातील अनेक संघ सहभागी झाल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
आष्टी : परतूर तालुक्यातील वाहेगाव येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३० जणांनी रक्तदान केले. यावेळी मनोज काटे, बाळासाहेब ढवळे, कोंडिबा बरसाले, जीवन सोळंके, माऊली गुंजकर, ओंकार काटे, उपसरपंच अशोक काटे, अमोल काटे, दादासाहेब लहाने, रामेश्वर काटे, कृष्णा काटे, अश्वमेध लहाने, सदाशिव काटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मंठा येथील विविध कार्यक्रमास प्रतिसाद
मंठा : बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. नगराध्यक्ष नितीन राठोड यांच्या हस्ते सेवालाल महाराज यांना भोग लावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष राठोड, बालासाहेब बोराडे, राष्ट्रीय बंजारा क्रांतिदल जिल्हाध्यक्ष हरिभाऊ चव्हाण, नंदलाल महाराज आडे, उत्तमराव महाराज चव्हाण, नामदेव चव्हाण, विनायक राठोड, आदींची उपस्थिती होती.