शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

शहिदांना अभिवादन : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:36 IST

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन अभिवादन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या तीन फेरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली.शहरातील टाऊन हॉल जवळच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृती स्तंभास मंगळवारी मुख्य शासकीय ध्वजवंदना आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास आ. राजेश टोपे, जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जि.प. उपाध्यक्ष सतीश टोपे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपाध्यक्ष राजेश राऊत, माजी आ. अरविंद चव्हाण, भास्कर दानवे, रामेश्वर भांदरगे, नागोजी सतकर, ब्रह्मानंद चव्हाण, एकबाल पाशा, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निºहाळी, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे, उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसीलदार संतोष बनकर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक रामेश्वरजी दायमा, तुळशीराम काळे, मंगलाबाई गिंदोडीया, इंदिराबाई तांबटकर, राणीरक्षा अब्दुल अजीज खॉ, अजीम खान, सुभद्राबाई शंकरराव देशमुख, कांताबाई विश्वंभर मिटकर, जयाबाई खांडेराव खलसे, कौशल्याबाई खरात, चांदबाई माणिकचंद कटारिया, प्रभावती गजानन जोशी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाNational Flagराष्ट्रध्वजBabanrao Looneykarबबनराव लोणीकर