शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे धोरण सहकार चळवळीला बाधा आणणारे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:27 IST

सरकारचे कुठलेही धोरण सहकार चळवळीस बाधा आणणारे नसल्याचे प्रतिपादन सहकार परिषदेचे राज्याध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सहकारक्षेत्रात सध्या संक्रमणाचा काळ सुरू असून, काही विशिष्ट घटकांकडून या क्षेत्राविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरविले जात आहे. त्यामुळे येथे संभ्रमावस्थेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. असे असले तरी सरकारकडून सहकार चळवळीला बळ दिले जात आहे. सरकारचे कुठलेही धोरण सहकार चळवळीस बाधा आणणारे नसल्याचे प्रतिपादन सहकार परिषदेचे राज्याध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.शहरातील आयएमए हॉल येथे शनिवारी सहकार भारती जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित सहकार मेळावा- कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष शिवरतन मुंदडा, औरंगाबादचे सी.ए. निखिल जाजू, जालना मर्चंट बँकेचे संचालक सुभाषचंद देवीदान, सचिव अ‍ॅड. दशरथ इंगळे, उपाध्यक्ष हेमंत ठक्कर, किशोर देशपांडे यांची उपस्थिती होती.चरेगावकर म्हणाले की, राज्यात सध्या २ लाख ३८ हजार नोंदणीकृत सहकारी पतसंस्था आहेत. त्यातील अनेक पतसंस्थांनी लेखा परीक्षण अहवालच सादर केलेला नसल्याने व काहींचे पत्ते शोधूनही सापडत नसल्याने ५४ हजार बोगस सहकारी पतसंस्था बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. दरम्यान, ज्यांच्या संस्था बंद पडणार आहेत, त्यांच्याकडूनच सहकार क्षेत्राविषयी कोल्हेकुई सुरू आहे. आज पतसंस्थांनी काळाची पाऊले ओळखून बदल केले पाहिजेत. जीएसटीमुळे लोकांमध्ये आजही अनेक गैरसमज आहेत. मात्र, जीएसटी ही आपत्ती नसून, इष्टापत्तीच आहे. नोटाबंदीच्या काळात विविध बँकांकडून ग्राहकांना पैसे देताना अडचणी निर्माण झाल्या. मात्र, याच काळात पैसे मिळण्यासाठी त्रास झाल्याचे उदाहरण कुठल्याच पतसंस्थेत पाहावयास मिळाले नसल्याचेही चरेगावकर यांनी सांगितले.