शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शेतकऱ्यांना वीज उत्पादनासह वृक्ष संवर्धनाचा रोखीने मोबदला द्यावा- बोराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी शेतक-यांना सौरपंप देण्यासह लावलेली झाडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी शेतक-यांना सौरपंप देण्यासह लावलेली झाडे संगोपन करून त्यांची वाढ करण्याची जबाबदारी शेतक-यांवर देऊन त्या बदल्यात त्यांना रोख मोबदला देण्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषीभूषण विजयअण्णा बोराडे यांनी केले. ते बाजार समितीच्यावतीने आयोजित आंबा महोत्सवात बोलत होते.या आंबा महोत्सवाचा शुभारंभ वेशास शेष महाराज गोदींकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, पंडित भुतेकर, जिल्हा सहकार निबंधक नारायण आघाव, कृषी उपसंचालक विजय माईनकर, माजी उपनगराध्यक्ष विलास नाईक, अभिमन्यू खोतकर, सभापती पांडुरंग डोंगरे आदींची उपस्थिती होती. प्र्रास्ताविक बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी केले.पुढे बोलताना बोराडे म्हणाले की, आज कोरडवाहू शेतकरी अडचणित आहे. त्यामुळे सौर उर्जा निर्मितीचे पॅनल अनुदान तत्वावर शेतक-यांना देऊन त्यातून निर्मित होणारी वीज ही वीज वितरण कंपनीने खेरदी करावी. तसेच वृक्ष लागवड आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी ही शेतक-यांकडे दिल्यास ती झाडे जिवंत राहतील. त्या बदल्यात त्यांना पर्यावरण कर म्हणून रोखीने मदत करावी असे आवाहन केले. जालन्यात रेशीम उपसंचालक कार्यालय सुरू करण्यासाठी देखील खोतकरांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. या दोन्ही बाबी आपण मुख्यमंत्री आणि वन विभागाच्या सचिवांशी बोलून लगेच यावर विचार करू असे आश्वासन दिले.यावेळी खोतकर म्हणाले की, या आंबा महोत्सवातून शेतकºयांना थेट मदत करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. यावेळी अरविंद चव्हाण, भास्कर अंबेकर, शेष महाराज गोदींकर, रत्नागिरी बाजार समितीचे सभापती दळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आंब्यांची विक्री जोरात झाली.

टॅग्स :MangoआंबाAgriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजारfruitsफळे