शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

सौंदर्य स्पर्धेतही मुलींना करिअरची मोठी संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 18:16 IST

मराठवाड्यातील मुलींनी न्यूनगंड सोडावा

- संजय देशमुख 

आपण सर्वांनी मिस इंडिया, मिस वर्ल्ड असे शब्द वर्षातून कधीतरी ऐकलेले असतात. परंतु त्यातील ज्या विजेत्या मुली असतात या क्वचित प्रसंगीच मराठवाडा विभागातील असतात. परंतु आता असे कुठलेच शहराचे बंधन राहिले नाही. या स्पर्धेत ग्रामीण भागातूनही मुलींना सहभागाची संधी मिळते. जालन्यासारख्या शहरातूनही अशा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून यशाची एकेक पायरी वर चढणाऱ्या प्रतीक्षा प्रशांत नवगिरे हिने सिद्ध केले आहे. 

सौंदर्य स्पर्धेकडे कशी वळाली ?मुळात घरातून खेळाचे वातावरण मिळाल्याने तलवारबाजी व इतर मैदानी क्रीडा प्रकारात आवड निर्माण झाली. क्रीडा प्रकारामुळे आपोआपच मन आणि शरीर स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करावा लागतो. यातूनच आपण सौंदर्य स्पर्धेतही भाग घेऊ शकतो ही कल्पना सुचली आणि या कल्पनेला वडील प्रशांत नवगिरे आणि आई विद्या यांनी प्रेरणा दिली. यातून या क्षेत्राकडे वळलो. केवळ क्षेत्रात सहभाग घेतला नाही तर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यशही खेचून आणले. परंतु हे यश अद्याप आपल्या मनासारखे नसून भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पोहोचायचे आहे.

आतापर्यंतचा प्रवास कसा झाला ?आपण यापूर्वी वर्धा येथे झालेल्या मिस महाराष्ट्र स्पर्धेत सहभाग नोंदवून द्वितीय स्थान पटकावले होते. तर नुकत्याच मिस इंडिया टियारा आणि ठाणे टूरिझम विभागातर्फे मिस इंडिया स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेत मराठवाड्यातून सेकंड रनर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार अभिनेते राणा ऋषद आणि श्वेता खंडुरी यांच्या हस्ते मिळाला.

मराठवाड्यातील मुलींनी साहस दाखवावेमराठवाडा म्हणजे मागासलेला भाग म्हणून ओळखला जातो. ही ओळख पुसण्यासाठी मुलींनीही चौफेर अभ्यास केला पाहिजे. सौंदर्य स्पर्धा हे आपले काम नाही, असा गैरसमज न करता आवड आणि क्षमता असल्यास यातही चांगले करिअर करता येणे शक्य आहे.

भविष्यात जर्मनी येथे आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आपली तयारी सुरू असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाताना चालू घडामोडी, तत्पर उत्तर देण्याची समयसुचकता, शरीर स्वास्थ्य यालाही महत्त्व असून, आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आपण लक्ष ठेवून आहोत. आज मुलींना अनेक क्षेत्रात करिअर करण्याची संधी निर्माण झाली आहे. सौंदर्य स्पर्धा ही आपल्यासाठी नाही, असा समज चुकीचा आहे. - प्रतीक्षा नवगिरे

टॅग्स :JalanaजालनाStudentविद्यार्थीMiss Indiaमिस इंडिया