शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनो, लागा तयारीला; जालना जिल्हा परिषदेची मेगा भरती, ४६७ पदे भरणार

By विजय मुंडे  | Updated: August 4, 2023 17:35 IST

अर्ज करण्याची मुदत- ५ ते २५ ऑगस्ट; ऑनलाईन प्रवेश पत्र परीक्षेच्या ७ दिवसांपूर्वी मिळणार

जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने १९ संवर्गातील गट- क ची सरसेवेची तब्बल ४६७ रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ५ ऑगस्टपासून जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणीस प्रारंभ होणार असून, जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या विविध ४२ संवर्गांपैकी १९ संवर्गातील गट क ची तब्बल ४६७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर अधिकची जबाबदारी पडली असून, कामकाजातही विस्कळीतपणा आला आहे. कोलमडलेली यंत्रणा पाहता शासनाने जिल्हा परिषदेंतर्गत सरळ सेवेतील गट क ची रिक्तपदे भरण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यानुसार जालना जिल्हा परिषदेच्या वतीने भरती प्रक्रिया राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

यासाठी शनिवारी ५ ऑगस्ट पासून जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणीस प्रारंभ होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही २५ ऑगस्टपर्यंत राहणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार तर इतर प्रवर्गासाठी ९०० रूपये शुल्क राहणार आहे. तर माजी सैनिक, दिव्यांगांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आली आहे. एकूणच जिल्हा परिषदेतील या मेगा भरतीमुळे जिल्ह्यातील तब्बल ४६७ जणांना नोकरी उपलब्ध होणार आहे.

अशी आहेत पदेआरोग्य पर्यवेक्षक- १, आरोग्य सेवक- ४० टक्के ४२, आरोग्य सेवक ५० टक्के- १०९, आरोग्य सेविका- १८२, औषध निर्माण अधिकारी- १२, कंत्राटी ग्रामसेवकांच्या ५० जागा भरल्या जाणार आहेत. कनिष्ट अभियंता (स्थापत्य)- २३, कनिष्ठ लेखाधिकारी- २, कनिष्ठ सहायक लेखा- ५, पशुधन पर्यवेक्षक- ४, प्रयोगशाळा तंत्रज्ञ- १, लघूलेखक (उच्च श्रेणी)- १, लघुलेखक (निम्न श्रेणी)- १, वरिष्ठ सहाय्यक लेखा- ४, विस्तार अधिकारी (शिक्षण वर्ग ३ श्रेणी-२)- १, विस्ताराधिकारी (सांख्यिकी)- ३, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक- ७, पर्यवेक्षिकांची ७ पदे भरली जाणार आहेत.

१४ संवर्गातील पदे जिल्हा परिषदेच्या वतीने सरळ सेवेतील वर्ग 'क' मधील ४६७ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १४ संवर्गातील ही पदे भरली जाणार असून, जिल्ह्यातील अधिकाधिक युवक, युवतींनी याचा लाभ घ्यावा.- वर्षा मीना, सीईओ, जि.प. जालना

टॅग्स :JalanaजालनाJalna z pजालना जिल्हा परिषदjobनोकरी