प्रशिक्षण शिबिर : ओमप्रकाश मोतीपवळे यांचे आवाहन
जालना : मानव सेवेत आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या रोटरी परिवारात कोणाचा वैयक्तिक अजेंडा चालत नाही, येथे रक्ताच्या पलीकडचे नाते संबंध निर्माण होतात. रोटरी परिवाराचे सदस्य बनल्यावर आपण केवळ गाव, जिल्हा, राज्यापर्यंत मर्यादित न राहता देश व विश्वाचे घटक बनतो. समाजकार्यात आनंद मानणारे स्वयंसेवक रोटरी हीच जात आणि सेवा हाच धर्म मानून सेवा करीत असल्याचे सांगत नवीन सदस्यांनी समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन रोटरीचे प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे यांनी येथे केले.
रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउनच्या वतीने प्रांत थ्री वन थ्री टू झोन सी अंतर्गत नवीन सदस्यांसाठी रविवारी एका हॉटेलमध्ये आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी डॉ. सुमित्रा गादिया, पुष्पा आरबळे, दिलीप मालपाणी, दादा करंजुले, मनीष नय्यर, रागिनी कंदाकुरे, समुपदेशक दीपक पोफळे, संचालक संजय अस्वले, गोविंदराम मंत्री, मनमोहन भक्कड, अध्यक्ष महेश धन्नावत, प्रशांत बागडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोतीपवळे पुढे म्हणाले, पॉल हॅरिस यांनी रोटरीची स्थापना करून आपले विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्यक्षात आणले. कायद्याचे अभ्यासक असलेले अध्यक्ष महेश धन्नावत यांना रोटरी सदस्यांना काय द्यायचे याचे ज्ञान असून, त्यांच्याप्रमाणेच समाजकार्यात रुची असलेले सक्रिय सदस्य बनवा, असे सांगून आज जगात सकारात्मक आणि नकारात्मकता सुरू असताना आपण सक्रिय होऊ, असा सल्ला शेवटी ओमप्रकाश मोतीपवळे यांनी दिला. या वेळी महेश भक्कड, दीपांक अग्रवाल, दिनेश छाजेड, दीपक गेही, अल्केश पित्ती, गौरव मोदी, आनंद जिंदल, पंकज गंधकवाला, राहुल भक्कड, अनुराग अग्रवाल, मनोज अग्रवाल, अनुप नानावटी, प्रतीक नानावटी, महेंद्र बागडी, अरुण मोहता, स्मिता चेचाणी, सुरेश साबू, प्रफुल्लता राठी, डॉ. नितीन खंडेलवाल, महेश माळी, श्रीकांत दाड, विरेश बगडिया, अक्षत झुनझुनवाला आदींची उपस्थिती होती.