वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
अंबड : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे. अनेक वाहनांमध्ये तोडलेल्या लाकडांची वाहतूक होताना दिसत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्याची दुरवस्था
जालना : शहरांतर्गत भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले असून, पालिकेने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
सूचना फलक गायब
मंठा : मंठा ते जालना मार्गावरील अनेक ठिकाणचे दिशादर्शक, सूचना फलक गायब झाले आहेत. नामफलकांअभावी चालकांची गैरसोय होत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
चालकांची कसरत
अंबड: शहरांतर्गत भागातील काही रस्त्यांचे दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्तीची मागणी होत आहे.