पारध : भोकरदन तालुक्यातील मोहळाई येथे लायन्स क्लब, औरंगाबाद व जाणता राजा प्रतिष्ठान, मोहळाई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २६० जणांची मोफत तपासणी करण्यात आली.
या शिबिरामध्ये नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे आजार, अपेंडिक्स, मूतखडा अशा विविध प्रकारच्या आजारांची तपासणी करण्यात आली. या शिबिरास परिसरातील नागरिकांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. लायन्स क्लबचे डॉ. एस. गायकवाड, डॉ. प्रभाकर काळे, डॉ. वृषाली गिरणारे, डॉ. श्रद्धा देशमुख, डॉ. विशाल बावस्कर, डॉ. कृष्णा पालकर यांनी रुग्णांची तपासणी केली. ३३ जणांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.
या शिबिरामध्ये जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बळीराम पालकर, सचिव सुखदेव पालकर, उपाध्यक्ष मदन पालकर, सहसचिव विनोद शिंदे, कोषाध्यक्ष विनोद पालकर, संतोष काकडे, शिवदास पालकर, पोलीस पाटील सुरेश पालकर, सरपंच सांडू पालकर, सखाराम पालकर, दिलीप पालकर, शालिकराम शिंदे आदींची उपस्थिती होती.
फोटो
मोहळाई येथे आयोजित शिबिरात नागरिकांची तपासणी करताना डॉक्टर दिसत आहेत.