शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

वन विभागाच्या हातावर तुरी देऊन बिबट्या शेतात पसार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:55 IST

शहरातील मत्स्योदरी देवी मंदिराजवळील तलावा शेजारी मंगळवारी दुपारी बिबट्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : शहरातील मत्स्योदरी देवी मंदिराजवळील तलावा शेजारी मंगळवारी दुपारी बिबट्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र वनविभागाच्या अधिका-यांनी हुलकावणी देऊन बिबट्या शेजारील शेतात पळाला. रात्री उशिरापर्यंत बिबट्याचा शोध सुरू होता.मत्स्योदरी देवी तलावाजवळ गट क्रमांक १७७ / १ शिवनाथ पिराणे यांचे शेत आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पिराणे यांचा सालगडी भगवान बर्डे शेतात काम करत असताना उसामध्ये बिबट्या झोपलेला दिसला. घाबरलेल्या बर्डे यांनी शेतमालक पिराणे यांना मोबाईलवरून शेतात बिबट्या असल्याची माहिती दिली. पिराणे यांनी शेताकडे धाव घेतली. शेतात बिबट्या असल्याची माहिती परिसरात वा-यासारखी पसरली. परिसरातील शेतकरी, नागरिकांनी पिराणे यांच्या शेतात गर्दी केली. शेतात बिबट्या आल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाच्या अधिका-यांना दिली. पाचच्या सुमारास वनविभागाचे अधिकारी शेतात दाखल झाले. नागरिकांच्या गोंधळामुळे बिबट्या बाजूच्या शेतात पळाला. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिका-यांनी प्रयत्न केले. मात्र सायंकाळी सातच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत बिबट्या पळून गेल्याचे प्रदीप पिराणे, बंडू खांडेभराड, गणेश तुपे, दत्ता गाजरे, किरण वैद्य, शिवाजी गाजरे, भीमा पुंड, गजानन पुंड, महादू माळोदे, शिवा खांडेभराड, अशोक पुंड, गोविंद पुंड यांनी प्रत्यक्ष पाहिले. वनविभागाकडे रात्री उशिरापर्यंत बिबट्याचा शोध घेण्यात आला. मात्र, परिसरात कुठेच बिबट्या आढळून आला नाही. शहरातलगतच बिबट्या आढळल्याच्या प्रकारामुळे अंबड शहरासह परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला पकडण्यासाठी या भागात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागleopardबिबट्या