शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

वन विभागास अस्वलाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:01 IST

वनविभागाने दोन दिवस अस्वलाची शोध मोहीम हाती घेतली, मात्र शोध लागला नसल्याने ही त्यामुळे शोध मोहीम थांबविली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : दोन दिवसांपूर्वी भोकरदन व फत्तेपूर येथे अस्वलाने हल्ला करून तीन जणांना जखमी केल्यानंतर अस्वलाचा शोध घेण्यासाठी दाखल झालेल्या वनविभागाने दोन दिवस या अस्वलाची शोध मोहीम हाती घेतली, मात्र २१ र्माच रोजी दुपारी २ वाजे पर्यंत अस्वलाचा शोध लागला नसल्याने ही त्यामुळे शोध मोहीम थांबविली. अस्वलाच्या हल्ल्यातील जखमीना वनविभागाच्या वतीने औषधोपचारासाठी प्रत्येकी दोन हजार प्रमाणे सहा हजाराचे धनादेश दिले.२० मार्च रोजी शहरात व फत्तेपूर शिवारात अस्वलाने अचानक येऊन नागरीकावर हल्ला केला. जंगलातून भरकटलेले हे अस्वल शहरातील धनगरवाडी शिवारात आले होते, त्याने आकाश सपकाळ वय १७ वर्ष याच्यावर अचानक झडप घालून त्याला जखमी केले. त्यानंतर नागरीकानी अस्वलाला हुसकाऊन लावल्याने हे अस्वल जोमाळा व फत्तेपूर शिवारात गेले फत्तेपूर शिवारातील गणेश गायकवाड यांच्या गट क्रमांक ३५ मधील शेतात शुभम संजय गायकवाड यांच्यावर हल्ला करून जखमी केले, तर याच गावातील सारंगधर तळेकर यांच्या गट क्रमांक १६९ या शेतात हौदाजवळ उभ्या असलेल्या रूख्मणबाई सारंगधर तळेकर यांच्यावर हल्ला करून पळ काढला. मात्र याच वेळी गावातील शंभर ते दीडशे नागरीक या अस्वलाचा पाठलाग करीत होते, त्यामुळे हे अस्वल मिळेल त्या दिशेने पळत होते. अस्वलाला पकडण्यासाठी वनविभागाचे १८ कर्मचाऱ्यांचे पथक आले होते, त्यांनी अस्वल पकडण्यासाठी पिंजरा लावला होता मात्र हे प्रयत्न अयशस्वी ठरले. बुधवारी जालना येथील सहायक वनसंरक्षक जी़एम़शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन जखमीची विचारपूस करून मदतीचे धनादेश दिले.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय दोडके वनपाल डी़सी़जाधव, एस़जी़ गाडेकर यांची उपस्थिती होती.अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिन्ही जखमीचा पूर्ण खर्च वनविभाग करणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी नमूद केले.भोकरदन व फत्तेपूर शिवारात अस्वलाने हल्ला करून तीन जणाना जखमी केल्यामुळे दोन दिवसा पासून भोकरदन शहरासह फत्तेपूर, गारखेडा, जोमाळा, मासनपूर, चौ-हाळा, बाभुळगाव, कोदोली या गावात अस्वलाने चांगलीच दहशत निर्माण केली होती. २१ मार्च रोजी या सात गावातील शेतकरी अथवा शेतमजुर शेताकडे फिरकलाच नाही जणावराना चारा पाणी करण्यासाठी सुध्दा चार ते पाच जणाच्या जथ्थ्याने जात होते.

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरी