शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बायोडायव्हर्सीटी पार्कसाठी अर्जुन खोतकर यांचा पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:39 IST

राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता मृद संधारण व जल संधारण करण्यासाठी व स्थानिक वनस्पतीच्या प्रजाती नष्ट न होऊ देण्यासाठी राज्यामध्ये बायोडायव्हर्सीटी पार्कची चळवळ सरकार पुढे नेईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जालना : राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता मृद संधारण व जल संधारण करण्यासाठी व स्थानिक वनस्पतीच्या प्रजाती नष्ट न होऊ देण्यासाठी राज्यामध्ये बायोडायव्हर्सीटी पार्कची चळवळ सरकार पुढे नेईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठवाडा व विदर्भातील वनस्पतीच्या स्थानिक प्रजाती नष्ट होत असून, मृद व जलसंधारण करावयाचे असल्यास तेथील स्थानिक प्रजातीचे राज्यामध्ये शासकीय जमिनीवर जिल्हानिहाय बायोडायव्हर्सीटी पार्क निर्माण करुन जतन करावे, असे नमूद केले होते. यावेळी इश्वेद बायटेकचे संजय वायाळ, आ. नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती होती.खोतकर यांनी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडेही यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. त्यांच्या पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे खोतकर यांनी सांगितले. मराठवाड्यात विशेषत: जालन्यामध्ये वनाचे अत्यल्प प्रमाण पाहता खोतकर यांनी २२ जून रोजी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वृक्ष लागवड ही व्यापक चळवळ करण्यासाठी पुढाकार घेतला. या बैठकमध्ये इश्वेद बायोटेकचे संजय वायाळ यांनी या कल्पनेला व्यापकता देण्यावर भर दिला. तेथूनच खोतकर यांनी जिल्ह्यातील सर्व अधिका-याबरोबर या संकल्पनेविषयी चर्चा केली. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीही या प्रस्तावाबाबत त्वरीत आदेश निर्गमित होण्यासाठी आवश्यक त्या बाबी प्रशासनाच्या पातळीवरुन पुरविण्यात येतील याची ग्वाही दिली.१०० एकरावर होणार पार्कवन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी जिल्हानिहाय दौरे करुन राज्यामध्ये वनाची वृध्दी होण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हानिहाय दौरे पूर्वीच केलेले आहेत. त्यात त्यांनी जालना जिल्ह्यास भेट दिलेली आहे.या बायोडायव्हर्सीटी पार्कच्या माध्यमातून लाखो झाडे जालना जिल्ह्यात लावली जाणार असून, १००- १०० एकरवर शासकीय जमिनीवर असे बायोडायव्हर्सीटी पार्क तयार करण्याचे नियोजित आहे.

टॅग्स :JalanaजालनाArjun Khotkarअर्जुन खोतकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस