शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अवैध नळजोडण्या नियमित करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:47 IST

शहरातील अवैध नळ जोडण्या शोधून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिकेने स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. मात्र, पाणीपट्टी वसुलीचा रेटा तसेच महसूल वाढीच्या दृष्टिने अधिकृत नळ जोडणीची संख्या वाढविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून अवैध जोडणी नियमित करण्यावर भर दिला जात आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील अवैध नळ जोडण्या शोधून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिकेने स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. मात्र, पाणीपट्टी वसुलीचा रेटा तसेच महसूल वाढीच्या दृष्टिने अधिकृत नळ जोडणीची संख्या वाढविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून अवैध जोडणी नियमित करण्यावर भर दिला जात आहे.शहरातील विविध भागांत असलेल्या अवैध नळ जोडण्या हा पालिकेसाठी अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरत आहे. त्यातच एकाच घरात दोन दोन नळजोडण्या असून, अनेकवेळा याविरोधात पालिका प्रशासनाकडून मोहीमही उघडण्यात आली पण स्थानिक राजकीय नेत्यांच्या दबावामुळे याला यश येऊ शकलेले नाही. त्यातच पालिकेचे उत्पन्न बुडत असल्याने मुलभूत सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. यावर तोडगा काढत पालिकेने अवैध नळजोडण्या दंड आकारुन वैध करण्यावर भर देण्याचा प्रयत्न चालवला आहे. पालिकेच्या पथकाकडून दोन महिन्यांत ४०० पेक्षा अधिक जोडण्या अधिकृत करण्यात आल्या असल्या तरी भविष्यात पाणी कर किती नागरिक भरतात यावर या मोहिमेचे यश अवलंबून आहे. वैध नळजोडण्यांपेक्षा अवैध नळजोडण्यांची संख्या तब्बल तिप्पट असल्याचे मालमत्तांच्या संख्येवरुन दिसून येते.नगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे एकूण ४४ हजार मालमत्तांची नोंद असून, नवीन मुल्यांकनानुसार सुमारे २५ हजारांवर मालमत्तांची वाढ झाली आहे. असे असताना वैध नळ जोडण्यांची संख्या अत्यंत कमी आहे. पाणीपुरवठा विभागाकडे १८ हजार आणि मालमत्ता विभागाकडे सुमारे २२ हजार नळ जोडण्या असल्याची नोंद आहे. शहरातील बहुतांश भागांत अवैध नळ जोडण्या मोठ्या प्रमाणात आहे. कन्हैय्यानगर, लोधीमोहल्ला, दुखीनगर, सुंदरनगर, चंदनझिरा, शेरसवारनगर, शंकरनगर, लालबाग, गांधीनगर या भागात अवैध नळ जोडण्यांची प्रमाण अधिक आहे. काहींनी घरगुती वापराबरोबरच व्यावसायिक कामांसाठी चक्क मुख्य जलवाहिनीवर अवैध नळ जोडण्यात घेतल्याचे तपासणीत समोर आले आहे. अंतर्गत जलवाहिनीचे काम सुरू झाल्यानंतर अवैध नळ जोडण्यांची शोध मोहीम पालिकेने हाती घेतली. यासाठी नवीन जालना व जुना जालना, अशी दोन स्वतंत्रे पथकेही तयार करण्यात आली.मात्र, पथकाने पाणीचोरी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याऐवजी दंडात्मक रक्कम व एका वर्षाची पाणीपट्टी आकारुन अवैध जोडण्या नियमित करण्याचे धोरण अवलंबले आहे.मागील दोन महिन्यांत चारशेहून अधिक अवैध जोडण्यात नियिमित करण्यात आल्या असून, सुमारे १४ लाखांची वसुली करण्यात आली आहे. मात्र, एकूण अवैध नळजोडण्यांचा विचार करता ही कासवगतीच असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे वर्षानुवर्षे पाणी चोरी करणाºयांना नाममात्र दंड आकारला जात असल्याने नियमितपणे पाणीपट्टी भरणाºयांवर एक प्रकारे हा अन्यायच असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

टॅग्स :WaterपाणीJalanaजालना