शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी सोडून फुलविली द्राक्षबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 00:00 IST

नोकरी सोडून वडिलोपार्जित शेतात एकत्रित कुटुंबपद्धती जोपासत भावांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत एक एकरमध्ये युवा शेतकरी बंधुंनी द्राक्ष बाग फुलविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : नोकरी सोडून वडिलोपार्जित शेतात एकत्रित कुटुंबपद्धती जोपासत भावांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत एक एकरमध्ये युवा शेतकरी बंधुंनी द्राक्ष बाग फुलविली आहे. ही द्राक्ष बाग पाहण्यासाठी व खरेदीसाठी मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी व व्यापारी भेट देत आहेत.कानडी (ता. मंठा) येथील आश्रुबा वामनराव खंदारे व राजेश वामनराव खंदारे यांच्याकडे वडिलोप्रार्जित २० एकर शेतजमीन आहे. खंदारे हे गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पिके घेतात. पण, अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. आश्रुबा खंदारे हे महाविद्यालय प्रयोग शाळा सहायक म्हणून काही दिवसांपूर्वी नोकरी करीत होते. उच्चशिक्षित असतानाही शेतीपेक्षा नोकरी उत्तम या मानसिकतेला छेद देत नोकरी सोडून एकत्रित कुटुंब पद्धती जोपासत त्यांनी भावाच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत एक एकरमध्ये द्राक्ष बाग फुलविली आहे.मे २०१८ मध्ये लावगड केल्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत योग्य संगोपन केले. या दरम्यान ६ लाखांचा खर्च झाला. २२ महिन्यांची द्राक्ष बाग असून, योग्य भाव मिळाल्यास तब्बल १२ लाखांचे उत्पन्न होईल, असा विश्वास खंदारे बंधूंनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :fruitsफळेagricultureशेती