जिल्हा परिषद उर्दू व मराठी माध्यमाच्या शाळेत मुख्याध्यापक ए.ए.भारती, आर. वाय.कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी केंद्रप्रमुख पी. बी. सोनवणे, नूतन ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे, जफर शेख, जहीर शेख, मोबिन शेख, युसूफ शेख, अझर शेख, अंबादास कनगरे, रामेश्वर दळवी, रावसाहेब पवार, अजीम शेख, अनंता दळवी आदींची उपस्थिती होती.
येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवक एस. आर. पडोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कर्मचारी योगेश वैध, रमेश कनगरे, नारायण मोकासे नूतन ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे, जफर शेख, जहीर शेख, मोबिन शेख, युसूफ शेख, अझर शेख, अंबादास कनगरे, रामेश्वर दळवी, जुनेद शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
येथील केशरबाई महाविद्यालयात मुख्याध्यापक रामदास गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर दीपभारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक बी. के. जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
------------------
नेर येथे ध्वजारोहण
नेर : येथील अभिजित विद्यालयात मुख्याध्यापक जी. एन. बुरूकूल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर ज्ञानज्योत कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य रामनाथ पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्रीकांत राठोड, चरणसिंग बायस, अक्षय खोंडे व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
------------------
पारडगाव येथे संविधान प्रास्ताविकेचे वाचन
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात गणेश ढेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र शिरसाठ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. लालबहादूर शास्त्री विद्यालयातील प्राचार्य संतोष खोजे यांच्या हस्ते तर ग्लोबल शाळेत ज्ञानेश्वर सुरशे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी संजय काचेवाड, मुख्याध्यापक रवींद्र शिरसाठ, जावेद खान, मोहम्मद दुरदाना, अर्जुन खरात, प्राचार्य संतोष खोजे, रजेश नवल, परमेश्वर बिडवे, राजेश जायभाय, प्रशांत बिडवे, बाळासाहेब तनपुरे, लक्ष्मीकांत माने, मतीन पठाण, वाय.एस. ढवळे, एस. पी. गाजरे, एम. एस. वैष्णव, पी. डी. ढेरे, छाया विभुते, आर. बी. डोळझाके, रेखा कुमावत, मुदस्सर कुरेशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.