शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार ‘आचार्य कुलम’ उभारणार-सुमनादीदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:30 IST

भारताची भावी पिढी सक्षम बनविण्यासाठी पतंजली योगपिठाद्वारे देशात पाच हजार आचार्य कुलम उभारणार असल्याची माहिती पतंजली योगपीठाच्या केंद्रीय महिला प्रमुख डॉ. सुमनादीदी यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भारताची भावी पिढी सक्षम बनविण्यासाठी पतंजली योगपिठाद्वारे देशात पाच हजार आचार्य कुलम उभारणार असल्याची माहिती पतंजली योगपीठाच्या केंद्रीय महिला प्रमुख डॉ. सुमनादीदी यांनी दिली.योग गुरु रामेदवबाबा यांचे तीन दिवसीय मोफत चिकित्सा व योग शिबीर पुढील महिन्यात जालन्यात होत आहे. शिबिराच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पतंजली योगपीठाच्या कार्याबद्दल डॉ. सुमनादीदी यांनी माहिती दिली. गत दहा वर्षात पतंजली योगपीठाने योग, आयुर्वेद आणि स्वदेशी या क्षेत्रात ऐतिहासिक योगदान दिले आहे. त्यामुळे योग देशातच नव्हे तर परदेशातही भारताची ओळख बनला आहे. आयुर्र्वेदिक क्षेत्रात पतंजली पीठाने सातत्याने केलेल्या कार्यामुळे नागरिक आता आयुर्वेदिक औषधांचा वापर करत आहे. पतंजलीच्या आयुर्वेदिक केंद्रामध्ये देशभरात वीस हजार आयुर्वेदिक डॉक्टर काम करत असून, ही संख्या अपुरी आहे. प्रत्येक क्षेत्रात नकारात्मक वातावरण वाढत आहे. मात्र, देशाला नकारात्मक नव्हे तर सकारात्मक विचाराने राष्ट्रनिर्मितीचे काम करणा-या माणसांची गरज आहे. त्यामुळे भावी पिढीला चांगले शिक्षण देण्यासाठी पंतजली योगपीठाने भारतीय शिक्षा मंडळाची स्थापना केली आहे. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर या मंडळाच्या माध्यमातून पाच हजार आचार्य कुलम देशात सुरू केले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. शहिद जवानांच्या पाल्यांसाठीही स्वतंत्र शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.वाढत्या शारीरिक व मानसिक आजारांमुळे आज प्रत्येकला योग व आयुर्वेदाची गरज आहे. यासाठी जालन्यात योगगुरु रामेदवबाबा यांचे शिबीर आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान येथील कलश सीड्समध्ये सकाळी साडेपाच ते सात या वेळेत होणाºया शिबिरासाठी विविध पातळ्यांवर तयारी सुरू आहे. यासाठी तीस समित्यांची स्थापना करण्यात आली असून, प्रत्येकाच्या जबाबदा-या निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शिबिरात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पंतजली योगपीठाचे महाराष्ट्र प्रमुख बापू पाडळकर, राज्य महिला प्रभारी सुधा अळीमोरे, उद्योजक घनश्याम गोयल, उदय वाणी, कल्पना ठोकळ, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे आदींची उपस्थिती होती.