शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती घेणारे पाच पोलीस कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 14:30 IST

5 Police suspended who raids on Raosaheb Danve's office या निलंबनामुळे जालना पोलीस पुन्हा चर्चेत आले आहेत.

ठळक मुद्देविना आदेश कारवाई करणारे दोन उपनिरीक्षक, तीन पोलीस कर्मचारी निलंबित

जालना : कुठलेच कायदेशीर आदेश नसताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयात पोलिसांनी झाडाझडती घेतली होती. या प्रकरणी दोन पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

११ जून रोजी जाफराबाद येथे केंद्रीय राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. तेथे जाऊन जाफराबाद येथील पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, युवराज सुभाष पाेठरे हे दोन पोलीस उपनिरीक्षक आणि जमादार मंगलसिंग रायसिंग सोळंके, सचिन उत्तमराव तिडके आणि महिला पोलीस कर्मचारी शबाना जलाल तडवी यांनी कायदेशीर आदेश नसताना झाडाझडती घेतली. याप्रकरणी दानवे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. चौकशी अंती पाचही पोलीस कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सोमवारी निलंबित केले. या निर्णयाने संपूर्ण पोलीस दल हादरले आहे.

जालना पोलीस पुन्हा चर्चेतया निलंबनामुळे जालना पोलीस पुन्हा चर्चेत आले आहेत. गेल्या महिन्यात ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर व अन्य दोन पोलीस निलंबित झाले होते. तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण प्रकरणही गाजले होते. ही प्रकरणे शांत होत नाहीत, तोच पुन्हा एकदा जालना पोलीस चर्चेत आले आहेत. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेJalanaजालनाPoliceपोलिस