शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती जावांच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:20 IST

तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली वाडी येथील गर्भवती सख्ख्या जावांचा सोमवारी सकाळी १० वाजता शेतात कापूस वेचायला गेल्यानंतर विहिरीत पडून मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता गुन्हा दाखल झाला.

घनसावंगी : तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली वाडी येथील गर्भवती सख्ख्या जावांचा सोमवारी सकाळी १० वाजता शेतात कापूस वेचायला गेल्यानंतर विहिरीत पडून मृत्यू झाला. घटनेनंतर माहेरच्या मंडळींनी घनसावंगी ठाण्यात ठिय्या मांडला. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनवणे यांनी भेट दिल्यानंतर अखेर सोमवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता गुन्हा दाखल झाला.दोघींचेही मार्च व एप्रिलमध्ये लग्न झाले होते. दोघीही गर्भवती असल्याने माहेरकडील महिला मंडळींनी आक्रोश केला. यावेळी सर्व परिसरात स्मशान शांतता होती. काही नातेवाईकांनी मुलीच्या सास-यांना चोप दिला.गेल्या मार्चमध्ये दोघींच्या मात्या-पित्यांनी हुंडा देऊन विवाह करून दिले होते. हुंड्याची काही रक्कम बाकी होती. त्यासाठी सासरा व पती मारहाण करीत असल्याचे त्या माहेरी सांगत.घटनेच्या दिवशी त्यांनी माहेरी फोन करून मारहाण होत असल्याचे सांगितले. त्यामुळे मुक्ताचा भाऊ ज्ञानदेव चिंचोलीवाडी येथे आला असता त्यांना त्या घरी दिसल्या नाहीत. त्या शेतात गेल्याचे कळले. त्या ठिकाणी आलो असता त्या विहिरीच्या काठावर मृतावस्थेत दिसून आल्या. त्यांच्या तोंडातून रक्त निघत होते. ओठ फुटलेले होते. सर्व अंगावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या. दोघींजवळ ‘आम्ही सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहोत’ असे लिहिलेल्या चिठ्ठ्या निघाल्या. म्हणून कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार माहेरकडील मंडळींनी दिली.या तक्रारीवरून सासरा रामचंद्र बुधनर, जयश्रीचा पती अंगद, मुक्ताचा पती पोपट, दीर मनोहर, विहीर मालक रामेश्वर शिंदे (पोपट व अंगदचा मावसभाऊ) या पाच जणांवर ३०४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व पाचही जणांना पोलिसांनी सकाळी अटक केली. दुपारी न्यायालयात हजर केले असता २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे.बी. पुरी हे करीत आहेत.