शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आधी ३० दिवस दिले, आणखी दहा घ्या पण टिकणारे मराठा आरक्षण द्या: मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Updated: September 14, 2023 12:28 IST

शासनाच्या मागणीनुसार एक महिना दहा दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. परंतु, अंतरवाली सराटी येथील साखळी उपोषण सुरू राहणार आहे.

जालना/ वडीगोद्री : मुख्यमंत्री शिंदे धाडसी निर्णय घेणारे आहेत. ते आपल्याला न्याय देतील हा आपल्याला विश्वास आहे. मराठा समाजाला विश्वासात घेवून मी त्यांना वेळ दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी मागे हटणार नाही. त्यांनाही मागे हटू देणार नाही. साहेब, समाजाच्या वतीने आणखी दहा दिवस वाढवून घ्या. पण आम्हाला कायम टिकारे आरक्षण द्या. जीव गेला तरी आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही. मी भारावून गेलो नाही महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल. मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो. टिकणारे आरक्षण द्या. 

१७ व्या दिवशी उपोषण मागेमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनाेज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे आंदोलन करून त्याच दिवसापासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणकर्त्यांवर १ सप्टेंबर रोजी लाठीचार्ज झाला आणि त्याचे पडसाद राज्यात उमटले. उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार शासनाने जीआर काढून त्यात वेळोवेळी बदल केला. परंतु, त्यात उपोषणकर्त्यांनी मागणीनुसार बदल होत नसल्याचे सांगत ते बदल अमान्य केले. त्यानंतर शासनाच्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली. सर्वपक्षीयांची बैठकही झाली. त्यानंतर जरांगे यांनी एक महिन्याची वेळ देण्यास सहमती दर्शवित पाच अटी ठेवल्या होत्या. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी सकाळी अंतरवाली सराटी येथे धाव घेवून जरांगे यांच्याशी चर्चा केली आणि जरांगे यांनी उपोषणाच्या १७ व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिवून उपोषण मागे घेतले. 

साखळी उपोषण सुरू राहणारशासनाच्या मागणीनुसार एक महिना दहा दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. परंतु, अंतरवाली सराटी येथील साखळी उपोषण सुरू राहणार आहे. सरकारच्या समितीत आम्ही राहणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ठिकठिकाणी शांततेत सखळी उपोषण करावे. कोणीही कायदा हातात घेवू नये, आरक्षणाला गालबोट लागू देवू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

मनोज जरांगे कौन है..बाबा, तुझं पोरगं भारी आहे. स्वत:साठी नाही समाजासाठी लढतोय. ते जेव्हा मला भेटला तेव्हा वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर समाजाच्या प्रश्नासाठी भेटला. मी परवा दिल्लीला गेलो होतो. तेथे मला विचारलं मनोज जरांगे कौन है.. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात उपस्थितांमध्ये हशा पिकला. मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा प्रामाणिक असून, त्यामुळेच त्याला राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शासनही कटीबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाEknath Shindeएकनाथ शिंदे