शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिका झाल्यानंतर जालन्यात पहिलीच निवडणूक; काँग्रेसची कसोटी, महायुतीत असमन्वय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:14 IST

महानगरपालिकेची पहिली निवडणूक; सर्वपक्षीय इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

जालना : नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन दोन वर्षे लोटली असून, प्रथमच होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय इच्छुकांसह नेत्यांनी जोर लावला आहे. नगरपालिकेत सत्तेत राहिलेल्या काँग्रेसची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. महायुतीबद्दल मित्रपक्षांमध्येही एकवाक्यता नसून, भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची चिन्हे आहेत.

नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या जालना नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा जनतेतून विजयी झाल्या होत्या, तर ६१ पैकी २९ सदस्य काँग्रेसचे विजयी झाले होते. राष्ट्रवादीच्या ९ नगरसेवकांना सोबत घेऊन काँग्रेसने सत्ता मिळविली होती, तर शिवसेना-भाजपला प्रत्येकी ११ जागा मिळाल्या होत्या, तर दोन अपक्षांनीही बाजी मारली होती. नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कालावधी २०२१ मध्ये संपला तरी निवडणुका मात्र विविध कारणांनी लांबणीवर पडल्या होत्या. गत निवडणुकीत काँग्रेसच्या विजयात माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा वाटा मोठा होता; परंतु गाेरंट्याल हेच भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात पक्षीय फुटाफुटीचाही परिणाम स्थानिक राजकारणावर दिसून येत आहे.

महायुतीतील मित्रपक्ष भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये महायुतीबाबत बैठका झाल्या असल्या तरी ठोस निर्णय झालेला नाही. त्यात भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची चिन्हे असून, शिंदेसेना, अजित पवार गट एकत्र निवडणूक लढविणार असल्याचे दिसते. दुसरीकडे महायुतीतील काँग्रेस पक्षाची शहरातील राजकीय ताकद तुलनेने इतर पक्षांपेक्षा अधिक आहे. त्यात उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला असून, जिल्हाप्रमुखपद अद्यापही रिक्तच आहे. त्यामुळे मविआची मोट बांधणे आणि निवडणुकांत विजय मिळविण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचीच कसोटी लागणार आहे.

चार नगरसेवक वाढणारजालना नगरपालिकेत ६१ नगरसेवक आणि जनतेतून विजयी झालेल्या नगराध्यक्षा अशा ६२ सदस्यांची नियुक्ती झाली होती. यंदाच्या निवडणुकीसाठी १६ प्रभाग असून, ६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. महानगरपालिकेतील एकूण नगरसेवकांची संख्या चारने वाढली आहे.

इतर पक्षांची भूमिका महत्त्वाचीमहानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बसपा, एमआयएम, समाजवादी पार्टी आदी पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. मागील निवडणुकीत एमआयएम, वंचितच्या उमेदवारांनी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढविली होती. यंदाही हे पक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna Municipal Corporation's First Election: Congress's Test, Mahayuti Discord!

Web Summary : Jalna's first municipal corporation election tests Congress amid Mahayuti disunity. BJP may go solo. Congress, strong in the past, faces challenges with internal divisions and shifts.
टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदElectionनिवडणूक 2025Municipal Corporationनगर पालिका