शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकाविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:25 IST

सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनील काकडे यांच्याविरूद्ध १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनील काकडे यांच्याविरूद्ध १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.सुनील काकडे यांनी एका तक्रारदाराकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी प्रारंभी ३० हजार रूपयांची मागणी केली होती. नंतर तडजोड होऊन १० हजार रूपये तक्रारदाराने द्यावे असे निश्चित झाले होते. ही लाच नेमकी कुठे स्वीकारणार याचा तपशील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी गुरूवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण रामदास राऊत यांच्या विरूद्ध सापळा लावला. त्यावेळी कॉलर माईक, रेकॉर्डचा उपयोग करण्यात आला. परंतु राऊत याला शंका आल्याने त्याने पंचाच्या गळ्यातील कॉलर माईक हिसकावून घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यातून पोबारा केला होता.दरम्यान सापळा रचताना जी काही थोडीफार तथ्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागली, त्यानुसार पोलीस निरीक्षक काकडे आणि कृष्णा राऊत संबंधित तक्रारदाराकडून १० हजार रूपयांची लाच जुन्या मोंढ्याच्या प्रवेशद्वाराजवळ स्वीकारणार असल्याचे उघड झाले. यावरून शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना शाखेने सदर बाजार ठाण्याचे निरीक्षक सुनील काकडे याच्या विरूद्ध कलम ७, १२ तसेच कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.अद्याप या दोन्ही संशयीत आरोपींना अटक झाली नसल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पो. नि. आदिनाथ काशीद यांनी सांगितले. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग