शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

महाव्यवस्थापकांकडून रेल्वे अधिकाऱ्यांची झडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:05 IST

मुंबई येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्ल्या यांनी शनिवारी जालना येथील रेल्वे स्थानकाची पाहणी करुन अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेऊन सूचना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्ल्या यांनी शनिवारी जालना येथील रेल्वे स्थानकाची पाहणी करुन अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेऊन सूचना दिल्या.माल्ल्या यांनी रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी नव्यानेच उभारण्यात आलेल्या पुलाची पाहणी केली. तसेच मालधक्का, वेटिंग रुम, पार्किंग यावेळी पाहणी केली. तसेच जालना रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. मुंबई येथे रेल्वेचा लोखंडी पूल कोसळून झालेल्या अपघातात सहाजणांना जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत असल्याचे यावेळी माल्ल्या म्हणाले. माल्या यांनी रेल्वे स्थानकातील दाद-याची बारकाईने पाहणी केली. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या सूचना दिल्या. जुलै महिन्यापर्यत येथील रेल्वेस्थानकात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे यावेळी माल्या यांनी सांगितले. लवकरच रेल्वेची भरती पूर्ण होणार असून आवश्यक त्या रेल्वेस्थानकात सुरक्षा पुरविण्यात येईल. यात जालन्याचा सुध्दा समावेश असणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे महासचिव फेरोज अली, बाबुूराव सतकर, छोटे खॉ पठाण, अशोक मिश्रा रेल्वेचे बी. विश्वनाथ, नीलकांता रेड्डी, राजेश शिंदे आदींची उपस्थिती होती.गेट क्रमांक ७८ काम होणारयावेळी रेल्वे संघर्ष समिती पदाधिका-यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांची भेट घेऊन मागणी निवेदन दिले. वाढत्या प्रवाशांची गर्दी बघता येथील स्थानकामधील चौथ्या क्रमांकाचा प्लॅटफॉर्म सुरु करुन प्रवाशांची गैरसोय दूर करावी, तसेच गेट क्रमांट ७८ च्या भुयारी मार्गाचे काम तातडीने मार्गी लावावे, मुंबईला जाण्यासाठी नांदेड ते मुंबई रेल्वे सुरु करण्याची मागणी यावेळी रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी यावेळी माल्ल्ला यांना केली.या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन माल्ल्या यांनी दिले.

टॅग्स :railwayरेल्वेJalanaजालना