लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कामे आर्किटेक्ट नियुक्तीमुळे रखडल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत आर्किटेक्ट नियुक्तीची प्रक्रिया जिल्हा क्रीडा संकुल समितीने हाती घेतली आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी नळ कनेक्शन आणि इतर क्रीडांगणांच्या डागडुजीचे कामही हाती घेण्यात आले आहे.जिल्हा क्रीडा संकुलावर कोट्यवधी रूपये खर्च करून बास्केटबॉल, बॅडमिंटन यासह इतर विविध क्रीडांगणे तयार करण्यात आली. मात्र बांधलेल्या क्रीडांगणांची मोठी दुरवस्था झाली आहे. तर खेळाडूंना राहता यावे, यासाठी बांधलेले वसतिगृहही धूळ खात उभे आहे. आतील इलेक्ट्रीक व इतर कामे रखडल्याने या वसतिगृहाच्या इमारतीचा वापरही केला जात नाही. याबाबत ‘लोकमत’ने ‘क्रीडा संकुलाची दुरूस्ती रखडली..!’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आर्किटेक्ट नियुक्त करण्याबाबत हलचाली सुरू करण्यात आल्या होत्या. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष रवींद्र बिनवडे यांच्याकडे दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनीही ही प्रक्रिया करण्याबाबत मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता आर्किटेक्ट नियुक्तीची ई-निविदा जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने काढली जात आहे. आर्किटेक्ट नियुक्तीनंतर जिल्हा क्रीडा संकुुलातील रस्ते, विद्युतीकरणासह जिल्हा क्रीडा संकुलावरील मैदाने दुरूस्तीसह इतर विकास कामांना गती येणार असून, याचा शहरासह जिल्हाभरातील खेळाडूंना लाभ होणार आहे.जिल्हा क्रीडा संकुलातील व्यायाम शाळेच्या डागडुजीचे काम पूर्ण झाले आहे. या व्यायामशाळेतील साहित्य खरेदीच प्रक्रियाही सुरू आहे. साहित्य आल्यानंतर ही व्यायामशाळा भाडेतत्त्वावर दिले जाणार आहे.इतर क्रीडांगणाची दुरूस्तीजिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन, स्केटिंग, टेबल टेनिस यासह इतर क्रीडांगणांची डागडुजी केली जाणार आहे. एखादी संघटना पुढे आली तर ही मैदाने भाडेतत्त्वावर दिली जाणार असून, मिळणाºया उत्पन्नातून क्रीडांगणाची स्वच्छता व इतर कामे केली जाणार आहेत.
..अखेर आर्किटेक्ट नियुक्तीची प्रक्रिया झाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 01:29 IST