शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कामात कुचराई केल्याने प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 19:53 IST

शहरातील गोदावरी महाविद्यालयाने निवडणूक विभागाला याप्रकरणी सहकार्य केले नाही.

अंबड (जि. जालना)  : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामात कुचराई केल्याप्रकरणी अंबड येथील गोदावरी महाविद्यालयाचे प्राचार्य रामेश्वर हेमराज पवार यांच्यावर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या आदेशाने बुधवारी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीदार चिंतामण मिरासे यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मतदान प्रक्रियेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी निवडणूक विभागाने जानेवारी महिन्यात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थांना कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती मागविली होती. मात्र शहरातील गोदावरी महाविद्यालयाने निवडणूक विभागाला याप्रकरणी सहकार्य केले नाही.

गोदावरी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याविषयी प्राचार्य पवार यांना सूचित केले मात्र, प्राचार्य पवार यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी माहिती दिली नाही. यामुळे त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी बुधवारी दिले. 

160 जणांवर होणार गुन्हे दाखल सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्राचार्य रामेश्वर पवार यांनी निवडणूक कामात कुचराई केल्याने त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले. २३ मार्च रोजी निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी गैरहजर असणाऱ्या १६० कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याचे संकेत हदगल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalanaजालनाcollegeमहाविद्यालय