शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

पावणेचार लाखांवर युवा मतदारांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:20 IST

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात तब्बल ३ लाख ६६ हजार ४४५ युवा मतदारांची वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात तब्बल ३ लाख ६६ हजार ४४५ युवा मतदारांची वाढ झाली आहे. यात २ लाख १४ हजार युवक तर १ लाख ५२ हजार युवतींचा समावेश आहे. तर नुकताच राबविण्यात आलेल्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत १८ हजार २१६ मतदारांची वाढ झाली आहे.सर्वच राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी जोमात सुरू केली आहे. आजी-माजी मुख्यमंत्री संघटना बांधणीसाठी गावोगाव फिरत आहेत. सत्ताधारी विकास कामांचे ढोल वाजवित असून, विरोधक त्यांच्या चुकांवर बोट ठेवत समस्यांचा पाढा वाचत आहेत. मात्र, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाने मात्र, आपले मतदार नोंदणीचे काम अखंडपणे सुरू ठेवले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाभरात १३ लाख ८९ हजार ३३ मतदार होते. निवडणूक विभागाने राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत गत लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांची संख्या १५ लाख १६ हजार ४३१ वर गेली होती. यात ७ लाख ९८ हजार ७५० पुरूष तर ७ लाख १७ हजार ६८१ महिला मतदारांचा समावेश होता.लोकसभा निवडणुकीनंतरही निवडणूक विभागाने जिल्ह्यात विशेष नाव नोंदणी मोहीम राबविली. दुसºया विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नाव नोंदणीसाठी १९ हजार ६१० जणांचे अर्ज दाखल झाले होते.यात ९६१६ युवक व ९९९४ युवतींचे अर्ज आले होते. छाननीनंतर १२९४ अर्ज वगळण्यात आले. तर १८ हजार ३१६ मतदारांची नोंद झाली. यात ८ हजार ८९८ युवक तर ९ हजार ४१७ युवतींचा समावेश आहे.गत पाच वर्षात १८ ते २९ वर्षे वयोगटातील तब्बल तब्बल ३ लाख ६६ हजार ४४५ युवा मतदारांची वाढ झाली आहे. यात २ लाख १४ हजार युवक तर १ लाख ५२ हजार युवतींचा समावेश आहे. १८ व १९ वर्षे वयोगटातील ३४ हजार ४०१ तर २० ते २९ वर्षे वयोगटातील १ लाख ३९ हजार ९५१ मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण १५ लाख ५२ हजार ५९९ मतदार असून, यात ८ लाख १६ हजार २३२ पुरूष तर ७ लाख ३६ हजार ३६५ महिला मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, दुष्काळ, वाढती बेरोजगारी, उद्योग, शैक्षणिक सुविधा, आरोग्य यासह इतर योजनांची अंमलबजावणी, युवकांसमोरील प्रश्न आणि शासनाबाबत युवकांची भूमिका आगामी निवडणुकीत मतदानाच्या स्वरूपातून समोर येणार आहे. त्यामुळे युवकांची अधिकाधिक मते आपल्याच पारड्यात पडावीत, यासाठीही राजकीय पक्ष विशेष लक्ष देत आहेत.आता लागणार ‘ओटीपी’यापूर्वी निवडणूक विभागाच्या वेबसाईटवरील सहा नंबरचा अर्ज कोठेही भरता येत होता. अर्ज भरून युवा मतदारांना नाव नोंदणी करता येत होती. मात्र, आता या प्रक्रियेत बदल करण्यात आले असून, युवक आपल्या मोबाईलवरूनही नाव नोंदणी करू शकणार आहेत. मोबाईल क्रमांक आणि त्यावर येणारा ‘ओटीपी’ टाकल्याशिवाय नाव नोंदणीचा आॅनलाईन अर्ज उघडणार नाही, हे विशेष!लवकरच मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर राबविले जाणार आहे. या शिबिरातूनही काही युवक, युवतींची नावे मतदार यादीत समाविष्ट होणार आहेत. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाधिक युवक, युवतींनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक