शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

शेतकऱ्यांना तारी गाय-म्हैस अन् शेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:39 IST

मराठवाडा कमी पावसाचा प्रदेश. त्यात गेल्या वर्षापासून या विभागाला दुष्काळ सातत्याने घेरतो आहे. त्यातून येणारी नापिकी आणि वाढणारे कर्ज अशा गुंत्यात अडकलेल्या शेतक-यांना महा पशुधन प्रदर्शनाने समृद्धी आणि उत्कर्षासाठी धवल मार्ग दाखविला.

ठळक मुद्देऐन दुष्काळात मराठवाड्यातील शेतक-यांना पशू प्रदर्शनाने दाखविला समृद्धीचा ‘धवल’ मार्ग!

भागवत हिरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाडा कमी पावसाचा प्रदेश. त्यात गेल्या वर्षापासून या विभागाला दुष्काळ सातत्याने घेरतो आहे. त्यातून येणारी नापिकी आणि वाढणारे कर्ज अशा गुंत्यात अडकलेल्या शेतक-यांना महा पशुधन प्रदर्शनाने समृद्धी आणि उत्कर्षासाठी धवल मार्ग दाखविला.

देशभरातून विविध जातींच्या देशी आणि संकरित गायी, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्या प्रदर्शनात दाखल झालेल्या आहेत.शेतकºयाला आर्थिकहात देणाºया शेळ्या-मेंढ्याघरात दुभती जनावर असावीत म्हणून सर्वसामान्यांना परवडणाºया शेळ्या-मेंढ्याही प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील जमुनापरी ही शेळीची वेगळी जात. उंचपुरी आणि भरलेली. दूध आणि मांसासाठी ती उपयोगी आहे. १ वर्षात बकरा ६० किलोंचा होतो, तर मादी दिवसाला ५ लिटर दूध देते. किंमत आहे १ लाख. दुसरी प्रजाती कोकण कन्याल. मांसासाठी उपयोगी असलेला नर ३० ते ३५ किलोंचा असतो, तर मादी २५ किलोंची. अति पावसाच्या प्रदेशातही ही प्रजाती टिकून राहते. उस्मानाबादी शेळी हा मराठवाड्यातील महत्त्वाचा प्रकार. उष्ण हवामानातही ही शेळी तग धरते. दिवसाला एक ते दीड लिटर दूध ती देते. बेल्टन जातीची शेळी एक ते दीड फुटाचीच. दोन वेळ तांब्याभर दूध देते. ती एक वेळा दोन पिले देते. संगमनेरी हा शेळीतील एक प्रकार. दीड ते दोन लिटर दूध देणारी ही शेळी दोन ते तीन पिले देते. दख्खनी मेंढी अर्धबंदिस्त पद्धतीनेही सांभाळता येते. महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटकात ही मेंढी मोठ्या प्रमाणात आहे. मेंढी पालनातून मांसाबरोबर लोकरीतूनही उत्पन्न मिळते. मांडग्याळ मेंढी जुळे देते. ती मांस उत्पादनासाठीच ओळखली जाते. आंध्रातील नेल्लोर मेंढीही प्रदर्शनात होती.म्हशीमुºहा म्हैस- म्हशीची ही जात दुधाला चांगली आहे. दिवसाला ही म्हैस सोळा लिटर दूध देते. सकाळी वैरण, संध्याकाळी भरडा इतका खुराक तिला पुरेसा आहे. जितकं रवंथ करील तितकं वाढीव दूध मिळते. या म्हशीची किंमत अडीच ते तीन लाख रुपये आहे.पंढरपुरी/सोलापुरी- लांब तलवारीसारख्या शिंगांमुळे पंढरपुरी म्हैस दिसायला लक्षवेधी आहेच. दुधालाही ती तशीच आहे. दिवसाला १६ लिटर दूध देते. सोलापुरी म्हैस ८ लिटर दूध देते. दोन लाखांपर्यंत ही म्हैस मिळते. पश्चिम महाराष्ट्रातील या दोन्ही म्हशी आता मराठवाड्यापर्यंत पोहोचल्या आहेत.जाफराबादी- जाफराबादी म्हैस तशी सगळ्यांना परिचित. दिसायला धष्टपुष्ट असलेली ही म्हैस दिवसाला १८ लिटर आणि सहा महिन्यांपर्यंत दूध देते. इतर म्हशींच्या तुलनेत ही म्हैस स्वस्त. ६० हजारांपासून ते १ लाखापर्यंत ती मिळते.देशी-संकरित गायीम्हशीप्रमाणेच वेगवेगळ्या जातींच्या विविध प्रदेशांतून भरपूर दूध देणाºया गायी प्रदर्शनात दाखल झाल्या होत्या.गीर - इतर गायींच्या तुलनेत गीरचे वेगळेपण म्हणजे गीर म्हैस आणि हिच्यात बरेच साम्य आहे. गीर म्हशीप्रमाणेच दिवसाला १४ लिटर दूध देते. साधारणत: १ ते दीड वर्ष दूध मिळते. किंमत म्हणाल तर ८६ हजारांपर्यंत ही गाय बाजारात मिळते.डांगी - पांढºयाशुभ्र अंगावर पांढरे ठिपके असलेली ही गाय तब्बल एक ते दीड लाखाला मिळते. दिवसाला दहा लिटर दूध देते.कपिला - गायींच्या प्रजातीपैकी हे देशी वाण. दिसण्याबरोबरच दुधालाही कपिला तशीच आहे. दिवसाला तब्बल तीस लिटर दूध देते.भारपारकर - ही गाय मूळची राजस्थानातील. स्वभावाने शांत. दोन्ही वेळा मिळून १३ लिटर दूध देते. हिच्या दुधाला १०० रुपये दर, तर तूप ३ हजार रुपये प्रति किलो या दराने विकले जाते.जर्सी /लाल कंधारी - जर्सी दिवसाला २५ लिटर दूध देते. विशेष म्हणजे वर्षभर तिच्यापासून दूध मिळते. नांदेड, लातूर भागात असणारी लाल कंधारी दिवसाला तीन लिटर दूध देते. हिचे बैल शेतीसाठी दर्जेदार असतात.पूर्णाथळी - दिवसाला ६ लिटर दूध ठरलेले. काय परवडते, असे म्हणत असाल तर हिच्या दुधात फॅ टस् जास्त असतात. न्यूट्रीशन नावाचे गवत दिले तर दूध वाढते. किंमत म्हणाल, तर फक्त २५ हजार. म्हणजे अल्पभूधारकाला परवडेल अशी ही गाय.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरी