शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धास्तीने गणेश भक्तांची पाऊले थबकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:38 IST

कोरोनाच्या संकटामुळे चतुर्थीच्या दिवशी देखील राजूरसह अन्य गणेश मंदिरामधील भाविकांच्या दर्शनासाठी येण्यावर परिणाम झाल्याचे विश्वस्तांनी सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हिंदू संस्कृतीत गणेशाला विघ्नहर्ता म्हणून संबोधले जाते. परंतु कोरोनाच्या या संकटामुळे चतुर्थीच्या दिवशी देखील राजूरसह अन्य गणेश मंदिरामधील भाविकांच्या दर्शनासाठी येण्यावर परिणाम झाल्याचे विश्वस्तांनी सांगितले. भाविकांचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या राजूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी चतुर्थीच्या दिवशी रांगा लावून दर्शन घ्यावे लागते. अनेक भाविक हे पायी वारीव्दारेही दर्शनासाठी जातात. परंतु गुरूवारी पार पडलेल्या चतुर्थीला दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले.राजूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी दर चतुर्थीला लाखो भाविकांची गर्दी असते. त्यामुळे मंदिरा समोर लांबच-लांब रांगा लावून दर्शन मिळते. किमान एक ते दीड तास रांगेत राहिल्यावरच दर्शन मिळत होते. ते आज अगदी कुठलीच रांग नसल्याने भाविकांना दर्शनासाठी अवघे दहा मिनिटेही लागली नसल्याचे दिसून आले. भाविकांची कोरोनाच्या धास्तीने राजूरसह अन्य मंदिरात जाणे टाळले. खूप आवश्यक असल्यासच गर्दी करावी अशा सूचना यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. त्याचेही पालन अनेक नागरिकांनी केल्याने ही गर्दी कमी झाल्याचे दिसून आले.राजूर : व्यापारावर परिणामदर चतुर्थीला राजूर येथील दुकांनामध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. परंतु या चतुर्थीला प्रथमच एवढ्या कमी भाविकांची उपस्थिती दिसून आली. याचा मोठा फटका येथील व्यापाऱ्यांना बसल्याचे दिसून आले. एसटी महामंडळासह खाजगी वाहतुकीवरही भाविकांच्या कमी गर्दीचा परिणाम झाल्याचे व्यापा-यांनी सांगितले.

टॅग्स :ganpatiगणपतीcorona virusकोरोनाReligious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम