शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हमीभाव खरेदी केंद्र सुरु नसल्याने शेतकऱ्यात संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:48 IST

जिल्ह्यातील चार केंद्रावर २४ आॅक्टोबर पर्यत १,०७३ शेतकºयांनी हमीभावाने सोयाबीन, मूग, उडिदाची विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही नाफेडने खरेदी केंद्र सुरु न केल्याने शेतक-यात संताप आहे

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात १,०७२ शेतक-यांची नोंदणी : मूग, उडिदाच्या नोंदणीस पंधरा दिवसांची मुदत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील चार केंद्रावर २४ आॅक्टोबर पर्यत १,०७३ शेतकºयांनी हमीभावाने सोयाबीन, मूग, उडिदाची विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही नाफेडने खरेदी केंद्र सुरु न केल्याने शेतक-यात संताप आहे. परिणामी, हमीभावापेंक्षा कमी दराने सोयाबीन, मूग, उडिद विकावा लागत असल्याने शेतकºयांत नाराजी सूर आहे.जिल्ह्यात जालना, अंबड भोकरदन आणि अंबड या चार केंद्रावर नाफेडने ९ आॅक्टोबर पासून आॅनलाईन नोंदणीस प्रारंभ केला. नोंदणी उशिराने सुरु होऊनही २४ आॅक्टोबर पर्यत १,०७२ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन, मूग, आणि उडिदाच्या उत्पन्नाला फटका बसला आहे. उत्पन्न अर्ध्यावरच आल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यातच शासनाने हमीभाव जाहिर केला, मात्र प्रत्यक्षात अद्यापही हमीभावाने खरेदी सुरु केली नाही. दसरा सण तर गेला आता दिवाळी सण काही दिवसावर येऊन ठेपला आहे. असे असतांना शासनाने खरेदी सुरु न करता पुन्हा नोंदणीस मुदत वाढ दिल्याने शेतकºयांच्या दिवाळी सुध्दा अशीच जाण्याची भीती आहे. पेरणीसाठी केलेली उसनवारी ंआणि सणासुदीसाठी घरात पैसे असावेत यासाठी शेतकºयांना व्यापाºयांच्या दारी जावे लागत असल्याचे चित्र आहे. हमीभावापेंक्षा कमी भावाने सोयाबीन, मूग, उडिद शेतकºयांना विकावा लागत आहे. यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सोयाबीन, मूग, उडिद आदींसह बारा पिकांना हमीभावाने खरेदी करावी अशा सुचना शासनाने दिलेल्या आहेत. मात्र याकडे कानाडोळा होत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. सोयाबीनला ३,३९९ हमीभाव जाहिर केला आहे. असे असतांना सध्या शेतकºयांना २६०० ते ३०२५ पर्यंत सोयाबीन विकावे लागत आहे. त्यातच ओलावा आणि काडीकचरा असल्याने सांगून व्यापारी भाव पाडून मागत असल्याचे शेतकरी साहेबराव तुपे यांनी सांगितले.मूग, उडिद नोंदणीला मुदतवाढशासनाने सोयाबीन, मूग, उडिद नोंदणीस १५ नोव्हेबर पर्यत मुदतवाढ दिली आहे. सुरुवातीला ९ आॅक्टोबर पर्यत मुदतवाढ दिली होती. यात पुन्हा वाढ करत २४ आॅक्टोबर मुदत वाढ दिली होती. बुधवारी मुदतवाढ संपल्याने पणन महासंघाने उशिराने आदेश काढून ही मुदत १५ आॅक्टोबर २०१८ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी गजानन मगरे यांनी दिली.

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र