शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

भय इथले संपत नाही... जालन्यात कोरोनाची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

जालना : कोरोना आज जाईल, उद्या जाईल, असे वाटत असतानाच कोरोना विषाणूची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर म्हणण्याची वेळ ...

जालना : कोरोना आज जाईल, उद्या जाईल, असे वाटत असतानाच कोरोना विषाणूची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर म्हणण्याची वेळ आली आहे. जालन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ६ एप्रिलला आढळून आला होता. जुना जालना भागातील एका महिलेला या विषाणूची लागण झाली होती. त्या घटनेला मंगळवारी वर्ष होत आहे. वर्षभरानंतरही हा कोरोना कायम असला, तरी त्यावरील उपचार पद्धतीत वैद्यकशास्त्राने मोठी प्रगती केली असून, लसीकरणापर्यंत आपण आलो आहोत. त्यामुळे कोरोनाशी दोन हात करताना मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही आघाड्यांवर लढा दिला जात असल्याचे दिसून येते.

गेल्या वर्षीची कोरोनाची स्थिती

जालना : एप्रिल २०२० मध्ये तीन रुग्ण, मे १२३ रुग्ण सापडले होते. त्यातील पहिल्या कोराेना रुग्णाचा मृत्यू झाला होता. जून ४२८, मृत्यू १५, जुलै १६९४ रुग्ण आढळून आले हाेते. त्या एकाच महिन्यात ६९ मृत्यू झाले होते. ऑगस्ट २५७६ कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यावेळी ६७ जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर ३७८९ रुग्ण आढळले होते. त्यावेळी ६८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर २२२९ बाधित होते. त्यावेळी ७८ मृत्यू झाले होते. नोव्हेंबर १५६३ रुग्ण तर मृत्यू ३२, डिसेंबर ७८१ बाधित तर मृत्यू ३२ जणांचा झाला होता.

चौकट

चालू वर्षातील स्थिती

जानेवारी रुग्ण ५८१, मृत्यू १६, फेब्रवारी १८१७ रुग्ण मृत्यू २७, मार्च १० हजार २८२ रुग्ण आढळून आले होते. तर, या एकाच महिन्यात ९२ जणांचा मृत्यू झाला होता. या कोरोनाबद्दलची विशेषत: म्हणजे गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये विक्रमी मृत्यू झाले होते. तर, चालू वर्षात मार्चमध्ये तब्बल ९२ जणांना प्राण गमवावे लागले.

-------------------------------------------

चौकट

वयोगटांनुसार मृत्यूचे प्रमाण

चाळीस वर्षांखालील २६ जणांचा मृत्यू झाला असून, ४० ते ५० वयोगटांतील ५६ जणांचा मृत्यू, तसेच ५० ते ६० या वयोगटांत १२९, ६० ते ७० वयोगटांत १५० जणांचा मृत्यू झाला आहे. ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांमध्ये १२५ जणांचा मृत्यू झाला आहे.

चाैकट

--------------------------------------------------------------

वयोमानानुसार पॉझिटिव्ह रुग्ण

० ते १५ - १७०२, १६ ते ३० - ५५७१, २१ ते ४५ - ७८११, ४६ ते ६० वर्ष - ६०६३, ६१ ते ७५ - ३६२२. या माहितीनुसार सर्वात जास्त रुग्ण हे २१ ते ४५ या वयोगटांतील आहेत. हे रुग्ण म्हणजे सुपरस्प्रेडर म्हणून तज्ज्ञांकडून ओळखले जातात. या वयोगटांतील रुग्णांकडून पाहिजे तशी दक्षता घेतली जात नसल्यानेही कोरोनाचा मोठा फैलाव होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

---------------------------------------------------------

चौकट

शहरी आणि ग्रामीण रुग्णांचे वर्गीकरण

जालना शहरात दुस-या लाटेत रुग्णवाढीचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. पहिल्या लाटेत मुंबई, पुणे यासह अन्य बाहेरील गावांहून आलेल्यांमुळे कोरोनाचा मोठा फैलाव होताे. तो चालू वर्षात ग्रामीणमध्ये कमी असल्याचे दिसून येत असून, दुसऱ्या लाटेत जालना शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. जालना शहर १२ हजार १४, ही टक्केवारी ४६ एवढी येते. ग्रामीण भागात १० हजार ७३० रुग्ण असून, याची टक्केवारी ही ४२ एवढी आहे. तालुका पातळीवरील शहरांमध्ये ३१२५ रुग्ण आढळून आले आहेत.

---------------------------------------------

बरे होणाऱ्यांची टक्केवारी लक्षणीय

एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या दरम्यान जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्ण २५ हजार ८६९ आढळून आले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असून, २१ हजार ८७२ रुग्णांनी मात केली आहे. त्याामुळे रिकव्हरी रेट अर्थात बरे होणारी टक्केवारी ८४.५५ एवढी आहे.

----------------------------------

कोरोनाकाळातील लक्षणीय मुद्दे

डॉक्टर, परिचारिकांचा लढा आजही तेवढ्याच हिमतीने सुरू

पीपीई किटचा वापर घटला

पुन्हा घराबाहेर चप्पल काढणे आणि हातपाय धुण्याला आले महत्त्व

आजही अनेक डॉक्टर, कर्मचारी घरापासून राहतात दूर

पोलीस, शिक्षक पुन्हा कारवाईसाठी रस्त्यावर

कोरोना विषाणूच्या रूप बदलावर अभ्यास सुरू

सामाजिक संस्था, राजकीय पक्षांकडूनही मदत अव्याहृत सुरू

जालन्यात कोविडच्या स्वतंत्र लॅबची स्थापना

दोन ऑक्सिजन प्लांटची उभारणी

अनेक सहकारी डोळ्यांदेखत गेल्यावरही पोलीस, वैद्यकीय स्टाफची सेवा सुरूच

राजकीय नेत्यांकडून संवेदनशीलतेचे दर्शन, अनेक गरजूंना केली मदत

स्वच्छतेला आले अनन्यसाधारण महत्त्व