शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:03 IST

महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत शेतकरी, युवकांनी बुधवारी सकाळी बँकेसमोर उपोषण सुरू केले.

लोकमत न्यूज नेटवर्कदाभाडी : येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत शेतकरी, युवकांनी बुधवारी सकाळी बँकेसमोर उपोषण सुरू केले.बदनापूर तालुक्यातील दाभाडी (वा.) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक विजय मुळे यांच्या कामकाजाबाबत दाभाडी परिसरातील नागरिक, सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदन देऊन उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी उपोषणास सुरूवात करण्यात आली. पीककर्ज वाटप, बेरोजगारांचे कर्ज, मुद्रा लोण, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या फाईली यासह इतर कामे वेळेवर होत नाहीत. कर्ज कमी प्रमाणात मिळते, अनेकांचे प्रस्ताव पडून आहेत, यासह इतर आरोप आंदोलकांनी केले आहेत. तसेच बँकेत दलालांचा वावर वाढला असून, संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी बबन जैवाळ, सलीम कुरेशी, रावसाहेब जैवाळ, कृष्णा टेकाळे, एकनाथ पवार, राजेंद्र जैवाळ, कृष्णा भेरे, संदीप बकाल, भगवान बकाल, इम्रान बागवान, जुल्फेकार बागवान, भगवान टेकाळे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, याबाबत मुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

टॅग्स :agitationआंदोलनbankबँकgovernment schemeसरकारी योजना