शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची लूट होणार नाही -लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : दुष्काळाने होरपळणtया शेतकरी नव्या उमेदीने पुन्हा एकदा आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळाने होरपळणtया शेतकरी नव्या उमेदीने पुन्हा एकदा आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे त्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच बाजारातील बोगस बियाणे, बनावट खतांची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यासह शेतकऱ्यांची लूट होणार नाही यासाठी वाटेल ते करा, मी तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शनिवारी झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत दिले.जालना जिल्हा खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा लोणीकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी आ. नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, विजय माईनकर यांच्यासह जि.प.च्या मुख्याधिकारी निमा अरोरा, कृषी विस्तार अधिकारी झनझन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी यंदा जालना जिल्ह्यात जवळपास सहा लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यासाठी बीटी बियाणांची जवळपास ११ लाख पाकिटे उपलब्ध असून, त्यांच्या विक्रीला प्रारंभ करण्यात आला आहे. सोयाबीन, मूग, मका इ. ची लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत असून, तुरीलाही शेतकरी प्राधान्य देतो, असे शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या खते, बियाणांचा मुबलक साठा असल्याचेही यावेळी कृषी विभागाने सांगितले. शेतकºयांची लूट थांबवण्यासाठी ९ भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. खतांची लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सांगून, पीककर्ज तातडीने वाटप करण्यासाठी नियोजन करावे असेही त्यांनी स्पष्ट केले.बाजारपेठ शेतक-यांसाठी सज्जयंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे बाजारपेठेत बियाणे, खत विक्रेते सज्ज झाले आहेत. यंदा कुठल्याही बियाणांची टंचाई जाणवणार नाही, असे कृषी खात्याकडून आढावा बैठकीत सांगण्यात आले. दुष्काळी वातावरण असल्याने ही बैठक नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. शेतक-यांनी बियाणे, खते खरेदी करताना पावती आवश्य घ्यावी, अशा सूचना सर्व विक्रेते तसेच शेतक-यांना दिल्या आहेत. या संदर्भात कृषी सहाय्यकांनाही गावागावात ही सूचना पोहोचविण्याचे काम दिले आहे. बीटी बियाणे, सोयाबीन आणि तूर, मूग इ. बियाणांची मुबलकता महाबीजकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रBabanrao Looneykarबबनराव लोणीकरMonsoon Specialमानसून स्पेशल