शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जासाठी शेतकरी दिवसभर ताटकळत..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:32 IST

खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदीसाठी हातात पैसा नसल्याने शेतकरी पीककर्ज मिळेल या आशाने बँकांमध्ये येत आहेत. मात्र, दिवसभर रांगेत उभे राहून पीककर्जाची फाईल जागची हालत नसल्याने शेतकरी हताश होवून घरी जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदीसाठी हातात पैसा नसल्याने शेतकरी पीककर्ज मिळेल या आशाने बँकांमध्ये येत आहेत. मात्र, दिवसभर रांगेत उभे राहून पीककर्जाची फाईल जागची हालत नसल्याने शेतकरी हताश होवून घरी जात आहेत.मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे बँकांनी पीककर्ज वाटपासाठी आखडता हात घेतला. शिवाय दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी नव्याने पीककर्ज घेतले नाही. जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाखांवर शेतक-यांचे ५९४ कोटींचे कर्जमाफ झाले आहे. कर्जमाफी योजनेअंतर्गत ९५ हजार शेतकरी नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरल्याने यंदा पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ५५ कोटी रुपयांनी वाढविण्यात आले आहे. जिल्हामध्यवर्ती बँकांच्या ६२ शाखांसह ग्रामीण व राष्ट्रीयीकृत बँकांमधून सध्या पीककर्जाचे वाटपाला सुरुवात झाली आहे. मात्र, बँकांमधील अपुरा कर्मचारी वर्ग, नियोजनाचा अभाव, तांत्रिक अडचणींमुळे पीककर्जाच्या संचिकांचा ढीग वाढतच आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दिवसभरात केवळ चार ते पाच शेतक-यांची कर्जप्रकरणे निकाली काढली जात आहेत. बँक अधिकारी शेतक-यांमध्ये वाद होत आहेत. ग्रामीण भागातून येणा-या दोनशे ते अडीचशे शेतक-यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. काही बँकांनी दत्तक गावांसाठी विशिष्ट वार ठरवून दिले आहेत. आपला वार असलेल्या दिवशी गावातील बहुतांश शेतकरी दिवसभर बँकेत बसलेले दिसत आहेत. ग्रामीण भागात तर जिल्हामध्यवर्ती बँकांच्या शाखांसमोर शेतकºयांच्या रांगाच-रांगा पहावयास मिळत आहे. खरिपाची कामे तोंडावर असताना आठवडाभर चकरा मारूनही पीककर्ज मिळत नसल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.ृ९० कोटींचे वाटपजिल्ह्याला खरीप हंगामासाठी १२३२ कोटींच्या पीककर्जाचे उद्दिष्ट आहे. सर्व बॅकांनी पीककर्जाच वाटपाला प्राधान्य देऊन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आ्ल्या आहेत. असे असेल तरी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या काही शाखांमध्ये अद्याप पीककर्ज वाटपास सुरुवात झालेली नाही. आतापर्यंत सुमारे ९० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप पूर्ण झाले आहे. उद्दिष्ट्याच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी