शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

युरिया टंचाईने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:45 IST

पेरणी योग्य पाऊस पडल्यानंतर आता पेरणीसोबतच टाकण्यासाठीच्या युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने अतिरिक्त युरियाचा साठा मागविला असल्याचे सांगण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पेरणी योग्य पाऊस पडल्यानंतर आता पेरणीसोबतच टाकण्यासाठीच्या युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने अतिरिक्त युरियाचा साठा मागविला असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ५० टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात यापूर्वी कृषी विभागाने जवळपास ३९ हजार ११० मेट्रीक टन युरियाचा साठा मागविला होता. तो विविध विक्रेत्यांना वितरितही करण्यात आला होता. मात्र, जोपर्यंत दमदार पाऊस पडत नव्हता तोपर्यंत युरियासह अन्य मिश्र खतांना मागणी नव्हती. परंतु गेल्या आठ दिवसात भोकरदन आणि जाफराबाद तालुके वगळता अन्य सहा तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठीची लगबग वाढली आहे. जिल्ह्यात पाच लाख ८८ हजार खरिपाचे क्षेत्र आहे. पैकी निम्म्या क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे यांनी दिली. दरम्यान, बाजारात युरिया मुबलक प्रमाणात असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे कृषी विस्तार अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी केला असला तरी प्रत्यक्ष बाजारपेठेत फेरफटका मारला असता आरसीएफच्या युरियाची टंचाई असल्याचे दिसून आले.एकूणच जी मागणी शेतक-यांची आहे, त्याला अनुसरून आम्ही युरियाची आठ हजार मेट्रिक टन अधिकची मागणी नोंदविली आहे.येत्या एक दोन दिवसात हा युरीया रेल्वे रॅकव्दारे जालन्यात पोहचेल असे यावेळी कृषी विस्तार अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी सांगितले. लवकरच साठा उपलब्ध होणार आहे.बाजारपेठेत शेतक-यांची गर्दीबाजारात सध्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी बियाणे, खते खरेदीसाठी गर्दी होत आहे. पाऊस पडल्याने शेतक-यांच्या चेहºयावर समाधान दिसून येत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी