राजूर : शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन शेतीत विविध नावीन्यपूर्ण प्रयोग राबवून पिके घेऊन आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
कृषी विभागाच्या वतीने नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेंतर्गत तपोवन येथील शेतकऱ्यांनी विविध लाभ घेऊन शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. सदर उपक्रमांची सोमवारी मंत्री रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, उपविभागीय कृषी अधिकारी एन.आर. कोकाटे यांनी पाहणी केली. दानवे यांनी वसंतराव कढवणे यांनी पॉलीहाऊसमध्ये लागवड केलेल्या जरबेरा पिकाची, दत्तात्रय फरकाडे यांच्या मिरची, झेंडूच्या फुलाच्या शेतीची पाहणी केली. यावेळी दानवे यांनी शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन शेतीत नवीन प्रयोग राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी सहकार बोर्डाचे चेअरमन बाबूराव खरात, मंडळ कृषी अधिकारी श्रीमंत इंगळे, कृषी पर्यवेक्षक सुनील रोकडे, कृषी सहायक अमोल देशमुख, दत्तात्रय फरकाडे, वसंतराव कढवणे, गजानन नागवे, भगवान नागवे, लक्ष्मण कढवणे, किशोर कढवणे, रामेश्वर कढवणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो